Wednesday, July 3, 2024

ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा

हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डी नीरो हे नुकतेच सातव्यांदा बाबा झाले आहेत. वयाच्या ७९ वर्षी रॉबर्ट डी नीरो हे वडील झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असताना त्यांना शुभेच्छा देखील दिल्या जात आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनीच याचा खुलासा केला आहे. रॉबर्ट हे सध्या त्याच्या आगामी ‘अबाऊट माय फादर’ सिनेमाचे प्रमोशन करत असून याच दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या नवीन आनंदाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे.

रॉबर्ट डी नीरो यांनी त्यांच्या पालकत्वाबद्दल सांगितले की, “मला माझ्या मुलांबद्दल कोणतेही नियम आखणे अजिबात आवडत नाही, मात्र दुसरा पर्याय देखील नसतो. मला जे वाटते तेच सर्व आईवडिलांना वाटत असेल. सर्वांनाच आपल्या मुलांनी योग्य दिशेला जावे असे वाटत असते. मुलांनी आयुष्यात चांगले काम करावे त्यांचा नेहमी हित व्हावे असे वाटते. मात्र कधी कधी असे होत नाही.

आपल्या नवीन जन्मलेल्या बाळाबद्दल सांगताना त्यांनी सांगितले, “मी आताच एका नवीन बाळाचा बाबा झालो आहे.” मात्र त्यांनी त्या बाळाबद्दल आणि त्याच्या आईबद्दल जास्त माहिती दिलेली नाही. रॉबर्ट हे आधीच सहा मुलांचे बाबा असून आता ते सातव्यांदा पुन्हा बाबा झाले आहेत. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून डायना एबॉटपासून मुलगी ड्रेना आणि मुलगा राफेल आहे. १९९५ साली त्यांना त्यांची गर्लफ्रेंड टोकी स्मिथपासून जूलियन आणि हारून ही जुळी मुलं झालीत. तर दुसऱ्या पत्नीपासून इलियट आणि हेलन ग्रेस हे अनुक्रमे मुलगा आणि मुलगी आहेत.

दरम्यान रॉबर्ट डी नीरो हे वडील असण्यासोबतच आजोबा देखील आहे. त्यांनी ‘द आयरिशमैन’, ‘द गॉडफादर: पार्ट 2’, ‘रेजिंग बुल’, ‘टॅक्सी ड्राइवर’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना दोनदा अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

भाऊ कदम यांनी केला आयुष्यातील सर्वात ‘गोड’ गोष्टीचा खुलासा, भावुक होत केले भरभरून कौतुक

Death Anniversary: ‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

हे देखील वाचा