भारतात क्रिकेटच्या बाबतीत जेवढे प्रेम आहे, तेवढे जगात कोणत्याही देशात पाहायला मिळत नसेल. छोट्या गल्ल्यांपासून ते मोठ्या मैदानांपर्यंत सर्वच ठिकाणी मुलं, मुली, माणसं फक्त क्रिकेट खेळतानाच दिसतात. प्रत्येकालाच या खेळात मोठे यश मिळवत सचिन आणि धोनी व्हायचे आहे. मात्र या खेळात अनेक अशा गोष्टी लागतात त्या खूपच महाग असतात. ज्या सामान्य किंवा घरोबा कुटुंबातील लोकांना सहजासहजी घेता येत नाही. याच कारणासाठीच नेक प्रतिभावान मुलांना देखील त्यांच्या स्वप्नापासून दूर व्हावे लागते. पण जर अशा प्रतिभासंपन्न मुलांना कोणाचा माहितीचा हात मिळाला तर ती मुलं स्वतः मोठी होती सोबतच देशाचे नाव देखील मोठे करतील.
View this post on Instagram
असेच एक मोठे आणि चांगले पाऊल उचलले आहे अभिनेता अर्जुन कपूरने. मुंबईच्या पनवेल भागात राहणाऱ्या अनिशाचे देखील असेच एक स्वप्न आहे की, देशासाठी क्रिकेट खेळायचे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे तिला ते शक्य होत नव्हते. तिचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेता अर्जुन कपूरने हात पुढे केला आहे. आता अनिशा ११ वर्षांची असून, आर्थिक तंगी असूनही ती खूप मेहनत करत क्रिकेट खेळात आहे. अर्जुनला जेव्हा याबाबत समजले तेव्हा त्याने तिची मदत करण्याचे ठरवले. तो अनिशाचा ती १८ वर्षाची होते तोपर्यंत ट्रेनिंग आणि साहित्याचा सर्व खर्च उचलणार आहे. अनिशा क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर तिचा आदर्श मानते. ती महाराष्ट्र्र क्रिकेट असोसिएशमध्ये देखील खेळली आहे.
अर्जुन कपूरने ही मदत केल्यानंतर अनिशा राऊत आणि तिचे वडील यांनी त्याचे आभार मानले आहे. सोबतच अर्जुन कपूर अनिशासाठी एक वरदान असल्याचे देखील सांगत आता ती नक्कीच चांगले खेळेल आणि देशाचे नाव उंचावेल असे सांगितले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन