Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड बाबो हेच फिटनेस प्रेम! उणे ११०° तापमानात ‘या’ अभिनेत्याने केला व्यायाम, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ठोकला सलाम

बाबो हेच फिटनेस प्रेम! उणे ११०° तापमानात ‘या’ अभिनेत्याने केला व्यायाम, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी ठोकला सलाम

बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून अनिल कपूर यांना ओळखले जाते. वयाच्या साठीतही ते कमालीचे फिट आणि ऍक्टिव्ह आहे. त्यांच्या फिटनेसला तर कोणीच तोड देऊ शकत नाही.आजच्या पिढीतील तरुण कलाकारांना देखील ते त्यांच्या फिटनेसने आणि या वयातील त्यांच्यात असणाऱ्या ऊर्जेने मात देतात. सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रिय आहे. ते सतत त्यांच्याशी संबंधित आणि कामाशी संबंधित अपडेट फॅन्सला देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अशातच अनिल कपूर यांनी त्यांचा एक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केला आहे. सध्या सगळीकडे फक्त त्यांच्या या पोस्टचीच चर्चा होत आहे. अनिल कपूर यांनी त्यांच्या वर्कआऊटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता तुम्ही म्हणाल आजपर्यंत त्यांनी असे किती व्हिडिओ पोस्ट केले यात काय खास आहे. अहो आहेच खास. हा व्हिडिओ खूपच वेगळा आणि आश्चर्यचकित करणारा आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते मायनस ११० डिग्री तापमानात वर्कआउट करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी अंगावर त्यांचा शर्टही घातलेला नाही. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “४० मध्ये खोडकर होण्याची वेळ गेली आहे. आता ६० मध्ये सेक्सी होण्याची वेळ आली आहे.” यासोबत त्यांनी फायटर मोड ऑन असा हॅशटॅगही दिला आहे.

त्यांच्या या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांच्या एकापेक्षा एक भारी कमेंट्स येत असून, सगळ्यांनीच त्यांच्या फिटनेस प्रेमाचे, उत्साहाचे आणि ऊर्जेचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा