Tuesday, June 24, 2025
Home हॉलीवूड क्या बात है! जगातील अतिशय टॉपच्या अनेक सेलिब्रिटींना पछाडत ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वाधिक फॉलोअर्स असणारी कलाकार

क्या बात है! जगातील अतिशय टॉपच्या अनेक सेलिब्रिटींना पछाडत ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वाधिक फॉलोअर्स असणारी कलाकार

सेलेना गोमेझ हॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आणि गायिका आहे. हॉलीवूडसोबतच तिने संपूर्ण जगात तिच्या सौंदर्याची, गायनाची आणि अभिनयाची छाप सोडली आहे. तिला ओळखत नाही असा व्यक्ती तर शोधूनही सापडणार नाही. भारतातही तिचा अतिशय मोठा चाहतावर्ग आहे. याच सेलेनाच्या संदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी सेलेना सतत तिच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी निगडित विविध अपडेट याच माध्यमातून तिच्या फॅन्ससोबतच जगाला देत असते. याच सोशल मीडियावर आता सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या कलाकारांच्या यादीत तिचे नाव सर्वात टॉपला गेले आहे. तिने याचा एक अतिशय मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Selena Gomez (@selenagomez)

सेलेना गोमेझ ही इंस्टाग्रामवरील पाहिली अशी महिला बनली आहे, जिच्याकडे सर्वाधिक फॉलोवर्स आहे. तिचे आता इंस्टाग्रामवर ४०० मिलियन अर्थात ४० कोटी फॉलोवर्स झाले आहे. याआधी हा किताब अभिनेत्री काइली जेनरकडे होता. तिचे इंस्टाग्रामवर ३८२ मिलियन अर्थात ३८.२ कोटी फॉलोवर्स आहेत. मात्र आता काइलीला पछाडत सेलेना सर्वाधिक फॉलोवर्स असणारी महिला सेलिब्रिटी ठरली आहे. हा किताब मिळवणाऱ्या सेलेनाने मागच्याच महिन्यात सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचे जाहीर केले होते.

प्राप्त माहितीनुसार मागच्या महिन्यात सेलेनाने टिक टॉकवर लाइव्ह येत फॅन्ससोबत संवाद साधला. यावेळी तिने सांगितले की, ती खूप खुश आहे. तिच्याकडे सर्वात चांगले मित्र आणि जगातील सर्वात चांगले फॅन्स आहेत. तिच्यासाठी यापेक्षा अधिक आनंदचाही बाब कोणतीच नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Selena Gomez (@selenagomez)

अभिनेत्री आणि गायिका असण्यासोबतच सेलेना एक निर्मातीसुद्धा आहे. तिने तिचा स्वतःचा ब्युटी ब्रँडही आहे. सेलेना गोमेझने टेलिव्हिजन मालिका ‘विझार्ड्स ऑफ वेव्हरली प्लेस’मध्ये पहिल्यांदा बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर ती पुढे संगीतविश्वात आली आणि तिला इथे प्रचंड यश मिळाले. सेलेनाने ‘कम अँड गेट इट’, ‘गुड फॉर यू’ आणि ‘लूज यू लव्ह मी’ यासह अनेक चार्ट टॉप अल्बम आणि वेगवेगळे सिंगल्स ट्रॅक गाणी केली आहेत. सेलेना गेल्या काही दिवसांपासून ‘द चेन्समोकर्स’ स्टार ड्रू टॅगगार्टबरोबरच्या नात्यामुळे लाइमलाईट्मधे आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ

कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू

हे देखील वाचा