Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड हम आपके हैं कौनच्या शूटिंग दरम्यान ‘या’ अभिनेत्रींच्या केसांना लागली होती आग, इतक्या वर्षांनी झाला मोठा खुलासा

हम आपके हैं कौनच्या शूटिंग दरम्यान ‘या’ अभिनेत्रींच्या केसांना लागली होती आग, इतक्या वर्षांनी झाला मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे बनले आहेत, ज्यांनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला आणि बॉलिवूडच्या इतिहासात सोनेरी अक्षरात नाव कोरून घेतले. असाच एक सिनेमा म्हणजे राजश्री प्रोडक्शनचा ‘हम आपके है कौन?’. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आणि सोबतच प्रेक्षकांचे खूप प्रेम देखील मिळवले. लग्नाची कॅसेट म्हणून चिडवलेल्या गेलेल्या या सिनेमाने अशी काही कामगिरी केली की आज तब्बल २५ वर्षांनंतरही या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे.

हम आपके हैं कौन? सिनेमात सलमान खान आणि माधुरी दीक्षितसोबत इतरही अनेक कलाकार होते. किंबहुना या सिनेमात दमदार कलाकारांची मोठी फौजच पाहायला मिळाली. अनुपम खेर, रीमा लागू, रेणुका शहाणे, मोहनीश बहल, बिंदू, सतीश शाहआदी अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात होते. आजही या सिनेमाचे अनेक किस्से तुफान गाजतात. कलाकार देखील या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानच्या अनेक आठवणींना अनेकदा उजाळा देताना दिसतात. असाच एक किस्सा जो हम आपके है कौन सिनेमाच्या सेटवर घडला होता तो आजही खूपच गाजतो. तोच किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हम आपके हैं कौन या सिनेमात तब्बल १३ गाणी होती.मुख्य म्हणजे १३ च्या १३ गाणी तुफान गाजली. यातलेच एक गाणे म्हणजे, ‘धिकताना धिकताना’ या गाण्याचे दोन व्हर्जन सिनेमात आहे. एका गाण्यात घरात बाळ आल्यानंतर कुटुंबातील सदस्य आनंद साजरा करतात ते आहे. त्याच गाण्याच्या शूटिंग दरम्यान एका अभिनेत्रींच्या केसांना मोठी आग लागली होती. त्यावेळी गाण्यात एका सीनमध्ये सगळे कलाकार फटाके फोडत हातात फुलबाजी घेऊन त्यांचा आनंद साजरा करतात. यातल्याच एका सीनमध्ये एक फूलबाजी जेष्ठ अभिनेत्री बिंदू यांच्या विगला लागली आणि त्यांच्या विगने पेट घेतला होता. बिंदू यांनी उत्साहाच्या भरात ती फुलबाजी इतकी जोरात फिरवली की त्यांच्या स्वत:च्याच विगला आग लागली होती.

मात्र त्यानंतर लगेच ती विझवली गेली. यात बिंदू किंवा इतर कोणालाही काहीच इजा झाली नव्हती. दरम्यान आजही हा सिनेमा टीव्हीवर लागला की त्याच उत्साहाने आणि आनंदाने संपूर्ण कुटुंबासह पहिला जातो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा