माही गिल बॉलिवूडमधील परिचित चेहरा. आपल्या बोल्ड लूकने आणि आकर्षक अदांनी तिने अनेकांना घायाळ केले. मादक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या माहीचे अनेक फॅन्स आहेत. मोजक्या मात्र उत्तम अशा चित्रपटांमधून तिने तिच्या अभिनयाची झलक सर्वांना दाखवली. मागील काही काळापासून गायब असलेली माही अचानक आता चांगलीच चर्चेत आली आहे. या अचानक मीडियामध्ये येण्याचे कारण देखील तसेच आहे. माहीने लपून छपून लग्न केल्याचे वृत्त समोर येत आहे.
एका मोठ्या वृत्तपत्राच्या बातमीनुसार माहीने उद्योजक रवि केसरसोबत लग्न केले आहे. २०१९ साली आलेल्या ‘फिक्सर’ सिरीजमध्ये दोघांनी एकत्र काम केले होते. एका माहितीनुसार ते आता गोव्यामध्ये राहतात आणि माही, रवीला वेरोनिका नावाची एक मुलगी देखील आहे. माहीने देखील तिने लग्न केल्याचे स्पष्ट केले आहे.
View this post on Instagram
माहीला तिचे खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडते. २०१९ मध्ये तिने जेव्हा सांगितले की, तिला अडीच वर्षाची मुलगी आहे तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला होता. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले होते की, “माझे काही वैयक्तिक कारणं आहेत ज्यामुळे मी सोशल मीडियावर वेरोनिकाचे फोटो पोस्ट केले नाही. मी खूपच खासगी आणि लाजाळू व्यक्ती आहे. माझ्या आयुष्यात अशा खूप जास्त गोष्टी आहेत, ज्या सार्वजनिक कधीच झाल्या नाहीत,”
माहीला जेव्हा तिच्या लग्नाबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, “मला लग्न करण्याची गरज काय आहे? मी अशीच खुश आहे, आणि मला वाटते की कोणीपण आनंदाने अविवाहित राहू शकतो. लग्नाशिवाय देखील मुलं आणि कुटुंब होऊ शकते. मला कधीच वाटत नाही की, मी यासाठी लग्न करावे. लग्नाबद्दल प्रत्येकाचे वैयक्तिक मत असते.”
दरम्यान माहीने ‘साहेब, बीवी अँड गँगस्टर’, ‘दबंग २’, ‘देव डी’ आदी अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा