Monday, July 1, 2024

खलनायकी भूमिकांमधून छाप पडणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला लग्नाच्या ३० वर्षांनंतरही नाही मुलंबाळं, तरीही आनंदात जगते आयुष्य

स्त्री म्हटले की तिचे लग्न आलेच आणि लग्न म्हटले की मुलं आलीच. एका स्त्रीच्या आयुष्यात आजच्या काळात देखील या दोन गोष्टी खूपच महत्वाच्या समजल्या जातात अविवाहित स्त्रीला सतत लग्न कधी करणार तर विवाहित स्त्रीला मुलं कधी होणार हे प्रश्न सतत विचारले जातात. याला अभिनेत्री देखील अपवाद नाहीत. सिनेविश्वात काम करणाऱ्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या लग्नानंतर मुलं झाली नाहीत म्हणून त्यांनी दत्तक मुलं घेतली. मात्र अशा देखील काही अभिनेत्री आहेत ज्यांनी मुलं होऊ दिली नाही किंवा दत्तक देखील घेतली नाही.

अशाच एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे सुधा चंद्रन. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय खलनायिका असणाऱ्या सुधा चंद्रन या उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सर्वोत्कृष्ट नृत्यांगना देखील आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक मोठ्या संकटाना तोंड देत यश आणि नावलौकिक मिळवले. त्यांचा जीवनाचा प्रवास खूपच खडतर होता. तरी देखील त्यांचा आत्मविश्वास आणि जिद्द डगमगली नाही आणि त्या सर्वांना तोंड देत पुढे गेल्या यशस्वी झाल्या. ५७ वर्षाच्या सुधा चंद्रन देखील मुलं नाही किंबहुना त्यांनी दत्तक देखील घेतले नाही. सुधा यांनी दिग्दर्शक रवी डांग यांच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला २९ वर्ष होऊनही ते आईवडील झाले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sudhaa Chandran (@sudhaachandran)

मुलं दत्तक घेण्याबद्दल त्यांनी एकदा एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “माझा मुल दत्तक घेण्यावर अजिबात विश्वास नाही. जर आपण मुल दत्तक घेतले आणि त्याला जेव्हा ते समजेल तेव्हा त्याला आपण आईवडिलांवर ओझे आहोत, असे वाटू लागल्यावर काय करणार.”

तत्पूर्वी सुधा यांचा एका रस्ते अपघातात पाय गेला असून, त्या कृत्रिम पायाच्या साहाय्याने काम आणि नृत्य करतात. त्यांनी ‘मयुरी’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. सुधा या तामिळ असून त्यांचे पती रवी हे पंजाबी असल्याने घरातून त्यांना लग्नाला मोठा विरोध झाला. मात्र सर्व विरोध झुगारून त्यांनी मंदिरात पळून जाऊन लग्न केले. सध्या सुधा हा एकता कपूरच्या ‘नागिन ६’ मध्ये खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐकावे ते नवलच! वयाच्या ७९ व्या वर्षी ‘हा’ अभिनेता सातव्यांदा झाला बाबा, स्वतःच केला खुलासा

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवणाऱ्या ‘या’ गायिकेचे वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन

हे देखील वाचा