Wednesday, July 3, 2024

४४ व्या वर्षी टॉपलेस झाली ‘ही’ अभिनेत्री, १५ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी बांधली लगीनगाठ

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे महेश बाबू. महेशने ना केवळ दाक्षिणात्य तर संपूर्ण जगात त्याचे मोठे प्रस्थ निर्माण केले आहे. एक सुपरस्टार म्हणून त्याला साऊथमध्ये ओळखले जाते. याच महेश बाबूचे अनेक कुटुंबीय देखील मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. अशाच त्याचा एक सावत्र भाऊ म्हणजे अभिनेता नरेश बाबू. नरेश बाबू हे नाव आता लोकांसाठी तितकेसे नवीन राहिले नाही. आपल्या खासगी आयुष्यामुळे ते मागील काही दिवसांपासून सतत मीडियामध्ये गाजत आहे.

नरेश बाबू यांनी काही दिवसांपूर्वीच चौथ्यांदा लगीनगाठ बांधली. त्यांनी अभिनेत्री पवित्रा लोकेशसोबत लग्न केले आणि ते चर्चेत आले. तसे पवित्रा यांचे देखील हे दुसरे लग्न आहे. या दोघांच्या वयामध्ये तब्बल १४ वर्षांचे मोठे अंतर आहे. आत अचानक पवित्रा लॉकेश चर्चेत येणायचे कारण म्हणजे त्यांचा एक टॉपलेस फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या बोल्ड फोटोमध्ये त्यांना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काहींनी त्यांना फोटो आवडल्याचे सांगितले आहे. आखणी हा फोटो त्यांचा एक सीन असल्याचे देखील सांगितले आहे. त्यांना अशा ग्लॅमरस लूकमध्ये पाहून अनेकांनी त्यांची तुलना अनेक मोठ्या अभिनेत्रींनशी केली आहे.

दरम्यान पवित्रा लोकेश या दाक्षिणात्य सिनेसृष्टीला एक ओळखीचा चेहरा आहे. त्या खासकरून कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये सहायक अभिनेत्रींच्या भूमिकेत दिसतात. त्यांनी चित्रपटांसोबतच अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील काम केले. मात्र नरेश बाबू सोबत लग्न केल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

सिक्स पॅक्सला व्हीएफएक्स म्हणणाऱ्या ट्रोलर्ससाठी शर्टलेस झाला सलमान, फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी

भरलेल्या स्टेडियममध्ये अभिषेकवर चिडली ऐश्वर्या; भाची नव्यावर देखील दाखवला राग, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा