बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ मोठ्या पडद्यापासून सध्या लांब असली तरी मीडियामध्ये या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असते. इलियानाच्या सोशल मीडिया पोस्ट तिला सतत लोकांमध्ये गाजवत असतात. मात्र आता इलियाना एका मोठ्या घोषणेमुळे कमालीची गाजत आहे. नुकतेच इलियानाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर असे काही पोस्ट केले आहे, ज्यामुळे ती गाजतही आहे आणि ट्रोलही होत आहे.
इलियाना डिक्रूझने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहे. यात एका फोटोमध्ये एका नवीन जन्माला आलेल्या बाळाचा बॉडीसुट दिसत आहे, ज्यावर लिहिले आहे की, “आता ऍडव्हेंचर चालू झाले आहे”. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने एक पेंडेंट दिसत आहे, ज्यावर ‘ममा’ असे लिहिले आहे. तिच्या या पोस्टमुळे मनोरंजनविश्वात आणि मीडियामध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून, ती प्रेग्नेंट असल्याचे यावर समजत असल्याने अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
या फोटोंसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “लवकरच येत आहे, छोटा डार्लिंग तुला भेटण्यासाठी आता वाट पाहू शकत नाही.” ही नक्कीच आनंदाची बाबा असली तरी इलियानाचे अजून लग्न झाले नसल्याने अनेकांनी तिला शुभेच्छा देताना बाळाच्या बाबांबद्दल देखील प्रश्न विचारले आहे. मात्र तिच्या या पोस्टमधून तिने हे नक्कीच स्पष्ट सांगितलेले नाही की ती प्रेग्नेंट आहे. फोटो पाहून अंदाज लावले जात आहे.
दरम्यान इलियानाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. यात तिची आई समीरा डिक्रूझ यांनीही कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. तत्पूर्वी इलियानाचे नाव अनेकांसोबत जोडले गेले होते. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनसोबत इलियाना लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, नंतर त्याचे ब्रेकअप झाले. पुढे तिचे नाव कॅटरिनाच्या भावासोबत देखील जोडले गेले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! टीव्ही जगतातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला देहविक्रीचे रॅकेट चालवण्याच्या आरोपाखाली अटक