Tuesday, June 24, 2025
Home साऊथ सिनेमा मोबाइल फोडण्याची धमकी देत व्हिडिओ काढणाऱ्या फॅनवर भडकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

मोबाइल फोडण्याची धमकी देत व्हिडिओ काढणाऱ्या फॅनवर भडकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओ व्हायरल

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील लेडी सुपरस्टार म्हणून नयनतारा ओळखली जाते. नयनतारा जरी साऊथमध्ये काम करत असली तरी तिने संपूर्ण जगात तिचा नावलौकिक मिळवला आहे. संपूर्ण जगात तिचे कोट्यवधी फॅन्स आहे. सध्या नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. तिचे लग्न आणि नंतर सरोगसीचा माध्यमातून झालेले मुलं यांमुळे ती सतत लाइमलाईट्मधे येत आहे.

नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत विग्नेश शिवनसोबत मंदिरात दर्शन करण्यासाठी गेली होती. त्यांचे मंदिरातील अनेक फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पंगुनी उथीराम (दक्षिण भारतीय लोकांचा एक सण) या शुभ दिनी ते दोघं आपल्या संपूर्ण परिवारासोबत मंदिरात दर्शनासाठी पोहचले होते. यावेळी एका व्हिडिओमध्ये नयनतारा अतिशय रागात दिसत आहे. तिची मोबाइलमध्ये शूटिंग करणाऱ्या एका फॅनवर तिने तिचा राग काढला. तिच्या अशा वर्तवणुकीमुळे तिचे फॅन्स आता नाराज झाले आहे.

नयनतारा तिच्या नवऱ्या आणि कुटुंबासोबत कुंभकोणम जवळील कामाक्षी अम्मन मंदिरात दर्शनासाठी पोहचले होते. यावेळी नयनताराचे हावभाव आणि तिचा राग पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मंदिरातील लोकांनी या स्टार कपल पाहून एकच गर्दी केली. त्याच्या आजूबाजूला होणारी लोकांची गर्दी पाहून त्यांना अपॆशीत असे दर्शन झाले नाही. ते गेले आणि पुन्हा दान करण्यासाठी आले तेव्हा तर तिथे असणारी गर्दी बेकाबु झाली आणि ते पाहून नयनताराचा संयम संपला.

नयनताराने तिचा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर ओरडत त्याला फोन तोडण्याची धमकी दिली तर तिचा पती विघ्नेश शिवन नंतर हे प्रकरण हाताळताना दिसला, तर पोलिसही गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान नयनताराचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होत असून, त्यावर आता फॅन्स प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करत आहे. तामिळ इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून नयनतारा ओळखली जाते. लवकरच ती शाहरुख सोबत जवान सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा