Sunday, July 14, 2024

वाईट कृत करताना पकडले होते ‘हे’ कलाकार, वर्षानुवर्षे कमावलेली इज्जत एका कृत्याने मिळाली धुळीला

हिंदी चित्रपटसृष्टी हे पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात नाव कमावण्यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेतात. अगदी शुन्यातून येऊन या क्षेत्रात आपली योग्यता सिद्ध केली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट जगतात जर यशस्वी व्हायचे असेल तर प्रचंड संघर्ष करावा लागतो हे प्रत्येकाच्या मनात पक्के भरले आहे. मात्र हिंदी चित्रपट जगतात असेही अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या एका चुकीने आणि पैसा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी निवडलेल्या चुकीच्या मार्गांमुळे या कलाकारांनी सगळी मिळवलेली प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. पाहूया कोणते आहेत ते कलाकार .

संजय दत्त (Sanjay Dutt)  – हिंदी चित्रपट जगतातील सर्वात गाजलेला आणि चर्चेत असलेला अभिनेता म्हणून संजय दत्तच्या नावाची चर्चा होत असते. मात्र अभिनेता संजय दत्तची १९८३ मधील बॉंम्बस्फोट प्रकरणी झालेली अटक सगळ्यांनाच धक्क करणारी होती. यावेळी संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे संजय दत्तवर देशद्रोही असल्याचा थेट आरोप लावण्यात आला होता.

श्वेता बासू प्रसाद (Shweta Basu Prasad) – अभिनेत्री श्वेता बासू प्रसादला वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. २०१४ मध्ये श्वेताला एका हॉटेलमध्ये रंगेहात पकडण्यात आले होते. यानंतर तिला सुधारगृहात पाठवण्यात आली होती.  या प्रकरणाची त्या काळात जोरदार चर्चा रंगली होती.

राज कुंद्रा ( Raj Kundra)  – उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती  राज कुंद्राचे अश्लिल चित्रफित प्रकरण देशभर गाजले. या प्रकरणाने देशभरात राज कुंद्रा यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. इतकेच नव्हेतर या प्रकरणात राज कुंद्राला तीन महिने जेलची हवा खायला लागली होती.

मंदाकिनी (Mandakini)    –  हिंदी चित्रपट जगतात गाजलेली अभिनेत्री म्हणून मंदाकिनीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते. मात्र या प्रतिभावान अभिनेत्रीचे डॉन दाऊद अब्राहमसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने मोठी चर्चा रंगली होती. यावेळी तिची मोठी बदनामी झाली होती.

फरदीन खान  (Fardeen Khan)  – या यादीत अभिनेता फरदीन खानचे नावही समाविष्ठ आहे. २००१ मध्ये फरदीन खानला कोकिम खरेदी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी अभिनेत्याची मोठी बदनामी झाली होती.फरदीनला जुहू पोलिसांनी रंगेहात पकडले होते.

शक्ति कपूर (Shakti Kapoor)    – हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून शक्ति कपूर यांचे नाव घेतले जाते. एका स्टिंग ऑपरेशनमुळे शक्ती कपूर यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. 2005 मध्ये, शक्ती कपूर यांनी एका टीव्ही रिपोर्टरला काही अपशब्द बोलले होते. . ज्यानंतर शक्ती कपूर यांची बरीच बदनामी झाली.

शाइनी आहूजा (Shahuni Ahuja)  – अभिनेता शाइनी आहूजावर २०११ मध्ये त्याच्या घरातील मोलकरणीने बलात्काराचा आरोप केला होता.ज्यामुळे त्याला सात वर्षाची कारावासाची शिक्षा दिली होती. त्यानंतर शिक्षा संपताच पून्हा चित्रपटात झळकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला काम मिळू शकले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा