Monday, July 1, 2024

‘माझी बॉडी खूप चांगली आहे, मग ग्लॅमरस फोटो का शेअर करू नये?’, बोल्ड इमेजवर ‘या’ अभिनेत्रीचं वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री सौंदर्या शर्माने अनुपम खेर यांचा चित्रपट ‘रांची डायरिज’ या चित्रपटातून 2017 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला भले ही सौंदर्याचे काम हळूहळू चालले होते पण आता एमएक्स प्लेअरवरील वेब सीरिज ‘रक्तांचल 2’ मधून तिच्या अभिनयाची गाडी चांगलीच रुळावर आली आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या बोल्ड इमेजबाबत मोकळेपणाने चर्चा केली.

या गोष्टीला कोणीही नकार देऊ शकत नाही की, सौंदर्याची गणना आता ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये होती. आता ‘रक्तांचल 2’ मधून ती या ईमेजमधून बाहेर येईल अशी आशा आहे. तिने बोल्ड इमेजबद्दल बोलताना सांगितले की, “हो मला आता एक अभिनेत्री म्हणून गांभीर्याने घेतले पाहिजे. हो माझी बॉडी खूप चांगली आहे, मग मी ग्लॅमरस फोटो का शेअर करू नये?”

सौंदर्याने अमेरिकेमधून तिच्या अभिनयाचे धडे घेतले आहेत. याबाबत बोलताना तिने सांगितले की, “मला या गोष्टीची जाणीव झाली की, मी अभिनय करू शकते. तुम्ही या क्षेत्रात एकतर ऍक्टर असता किंवा नॉन ऍक्टर असता. या दोन्हीमध्ये तुम्ही असू शकत नाही. यामुळे मी माझ्यात असणाऱ्या शैलीला आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न केला आणि मी परत आले.”

सौंदर्याचे असे म्हणणे आहे की, आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जर तुम्ही अभिनयाला एका पॅशनच्या रुपात घेत असाल, तर तुमच्यासाठी ती एक कला असते. तरंच तुम्ही वेब शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पात्र साकारू शकता. तिने सांगितले की, तिला आणखी एका वेब सीरिजमध्ये असाईन केले आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. ती म्हणते की, “मला कामात कोणत्याही भूमिकेशी काहीच प्रोब्लेम नसतो.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा