बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी हा लवकरच त्याचा स्टंट बेस शो ‘खतरो के खिलाडी’मधून टीव्हीवर परतणार आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी अनेक मोठी नावे समोर आली आहे. यात बिग बॉस १६ मधील काही स्पर्धकांचे देखील नाव आहे. यातले एक नाव म्हणजे बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन. त्याच्या नावामुळे त्याचे फॅन्स चांगलेच खुश होते. मात्र यात याबाबत अजून बातमी समोर येत आहे.
रोहित शेट्टीच्या या शोमध्ये अनेक संकटांना पार करत स्पर्धकांना पुढच्या फेरीत जाता येते. शेवटी जो सर्वात कमी वेळात उत्तम स्टंट करतो तो हा शो जिंकतो. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती की या शोच्या निर्मात्यांनी एमसी स्टॅनला शोची विचारणा केली आहे. या बातमीमुळे त्याचे फॅन्स चांगलेच सुखावले होते. मात्र आता अजून एक बातमी येत आहे.
View this post on Instagram
मीडियामधील रिपोर्टनुसार एमसी स्टॅनने रोहितचा हा हिट शो करण्यास नकार दिला आहे. निर्माते एमसी स्टॅनला पाहिजे तेवढी रक्कम देण्यासाठी तयार देखील झाले होते, तरी देखील त्याने या शोला नकार दिला आहे. मात्र त्याच्या नकाराचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. तत्पूर्वी प्राप्त माहितीनुसार अभिनेत्री सुंबुल तौकीरला देखील खतरो के खिलाडीची ऑफर देण्यात आली होती मात्र तिने ती नाकारली आहे. याबद्दल सुंबुल तौकीरने स्पष्ट केले की, तिला अशी कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. जर तिला ऑफर आली तर ती नक्कीच यावर विचार करेल. रोहित शेट्टीच्या या शोची मी फॅन असून अनेक कलाकारांच्या करियरसाठी हा शो महत्वाचा टप्पा होता. त्यामुळे मला शो ऑफर झाला तर मी विचार करेल असे देखील ती म्हणाली.
दरम्यान ‘खतरो के खिलाडी 13’ केपटाऊन ऐवजी अर्जेन्टिनामध्ये होणार आहे. या शो येत्या १७ जुलैपासून टीव्हीवर सुरु होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. मात्र यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाही.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा सुचित्रा सेन ‘त्या’ एका गोष्टीसाठी थेट गुलजार थांबलेल्या हॉटेलमध्ये त्यांना घेण्यासाठी पोहचल्या
हनुमान जयंतीनिमित्ताने ‘आदिपुरुष’सिनेमातील हनुमानाचा लूक रिव्हिल, ‘हा’ मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका