Tuesday, July 9, 2024

विराट कोहलीला देखील आपल्या आवाजाने वेड लावणारा ‘हा’ स्पर्धक ठरला इंडियन आयडॉलचा विजेता

टेलिव्हिजनविश्वातील लोकप्रिय शो ‘इंडियन आयडॉल 13’ला विजेता मिळाला. मागील काही आठवड्यांपासून सुरु असणारा आणि लोकप्रिय झालेल्या इंडियन आयडॉल शोचा नुकताच ग्रँड फिनाले संपन्न झाला. अंतिम फेरीत पोहचलेल्या सोनाक्षी कर, शिवम सिंह, चिराग कोटवाल, बिदिप्ता चक्रवर्ती, देवोस्मिता रॉय यांना मागे टाकत ऋषी सिंगने जेतेपदावर नाव कोरले. ऋषी सोशल मीडियावर अगदी सुरुवातीपासूनच चांगलाच लोकप्रिय होता. त्यामुळे त्याने जिंकावे यासाठी सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भरपूर विनंती आणि प्रार्थना देखील चालू होत्या. अखेर झाले देखील तसेच. ऋषी सिंगच्या नावाची घोषणा करताच एकच जल्लोष झाला.

नेहा कक्कर, विशाल ददलानी आणि हिमेश रेशमिया परीक्षक असलेल्या इंडियन आयडॉलच्या अंतिम फेरीत प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर ऋषीने बाजी मरत हा शो जिंकला. त्याला बक्षीस म्हणून ट्रॉफीसोबतच २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस आणि मारुती सुझुकी एसयूव्ही कार देण्यात आली. या सोबतच ऋषी सिंगला सोनी म्युझिक इंडियाबरोबर रेकॉर्डिंगचा एक कॉन्ट्रॅक्टही मिळाला आहे. विजेत्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ऋषीला त्याचे अश्रू अनावर झाले होते. हा शो जिंकल्यामुळे त्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे त्याने सांगितले. याशिवाय त्याने चॅनेल, परीक्षक आणि लोकांचे देखील आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by RISHI FOLLOWS ???? (@rishi__fandom)

दरम्यान ऋषी सिंह हा मूळचा उत्तर प्रदेश मधील रामनगरी अर्थात अयोध्येचा रहिवासी असून, त्याने कँब्रियन स्कुलमधून त्याचे शैक्षिणक शिक्षण पूर्ण केले. त्याला गाणी गाण्यासोबतच लिखाणाची देखील आवड आहे. मुख्य म्हणजे ऋषी सिंग हा त्याच्या आई-वडिलांचा खरा मुलगा नाही, त्यांनी त्याला दत्तक घेतले असल्याचे ऋषीनेच शोमध्ये सांगितले होते. विशेष गोष्ट म्हणजे स्टार क्रिकेटर विराट कोहली देखील त्याला सोहळा मीडियावर फॉलो करतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

हे देखील वाचा