Tuesday, July 9, 2024

काय सांगता! बॉलिवूडमधील ‘या’ दिग्दर्शकाने अभिनेत्रींच्या मृत्यूची जाहिरात छापून आणत केले होते सिनेमाचे प्रमोशन

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नेहमीच निर्मात्यांकडून वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी त्याचे प्रमोशन करणे खूपच आवश्यक असते. मात्र जर सिनेमाचे प्रमोशन विविध पद्धतीने केले तर तो सिनेमा अधिक प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहचतो आणि लोकं देखील आनंदाने तो बघतात. आजच्या काळात तर सिनेमाच्या प्रमोशनवरच त्यांचे यश टिकले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

मात्र तुम्हाला माहित आहे का, की एका सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी तर थेट अभिनेत्रींचे निधन झाल्याची खोटी बातमीच पसरवली होती. हा किस्सा आहे, ९० च्या दशकातला. १९९५ साली महेश भट्ट यांचा ‘क्रिमिनल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या ऍक्शन थ्रिलर सिनेमात मनीषा कोईराला, नागार्जुन, राम्या कृष्णन यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी महेश भट्ट यांनी सिनेमाचे हटके पद्धतीने प्रमोशन करायचे असे ठरवले.

महेश भट्ट यांनी ‘क्रिमिनल’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट ‘मनिषा कोईराला इज डेड’ अशी जाहिरातच छापून टाकली. या जाहिरातीमुळे एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण इंडस्ट्री हादरली. कोणालाच काही समजेल खुद्द मनीषा देखील या जाहिरातीमुळे हादरली होती. तिने ही बातमी वाचून थेट महेश भट यांना फोन केला, आणि सर्व सांगितले त्यावर त्यांनी ‘मी हे प्रमोशनसाठी केले आहे.’ असे सांगितले.

महेश भट्ट यांची प्रमोशन करण्याची ही पद्धत मनीषला अजिबातच आवडली नव्हती. क्रिमिनल सिनेमात मनीषाचा मृत्यू झाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळेच महेश भट्ट यांनी ही ट्रिक वापरली होती, मात्र हे कलाकारांसोबतच लोकांना देखील अजिबातच आवडले नव्हते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अण्णांचा हटके अंदाज! नागराज मंजुळने वाजवली हलगी अन् आकाश-सायलीने केला भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

हे देखील वाचा