बॉलिवूडचे नावाजलेले दिग्दर्शक शेखर कपूर यांचा जन्म ६ डिसेंबर १९४५ साली लाहोर येथे झाला. शेखर कपूर एके काळचे प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे भाचे आहेत. आपल्या मामांप्रमाणेच आपल्यालाही चित्रपटसृष्टीत काम करायचं आहे असं त्यांनी ठरवलं होतं आणि जे झालं सुद्धा! शेखर कपूर यांनी बॉलीवूडला मासुम, बैंडिट क्वीन, मिस्टर इंडिया सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.शेखर कपूर यांचं प्रोफेशनल लाईफ शिवाय खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहीलं आहे.
शेखर कपूर यांनी माजी पंतप्रधान आय.के. गुजराल यांची भाची मेधा गुजरालशी लग्न केले, परंतु दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या ९-१० वर्षानंतर १९९४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मेधा म्हणाल्या होत्या की त्यांच्या आयुष्यात काहीही ठीक होत नव्हतं, म्हणून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
शेखर कपूर यांनी मेधाशी घटस्फोट घेतल्यानंतर १९९७ मध्ये अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीशी लग्न केले. पण शेखर यांचे सुचित्राबरोबरचे लग्नही फार काळ टिकले नाही. २००७ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सुचित्राने अभिनेत्री प्रीती झिंटावर आरोप केले. शेखर आणि प्रीती यांचे प्रेमसंबंध असल्याचे एका मुलाखतीत सुचित्राने स्पष्टपणे सांगितले. सुचित्रा आणि शेखर यांना कावेरी नावाची एक मुलगीही आहे.
सुचित्रा कृष्णमूर्ती यांचे हे आरोप प्रिती झिंटा यांनी उघडपणे फेटाळून लावले. प्रीती म्हणाली की हे दुर्दैवी आहे. शेखरशी माझे संबंध विशेष आहेत. त्याच्यामुळेच मी इंडस्ट्रीमध्ये आली. सुचित्राने केलेल्या आरोपानंतर प्रीती म्हणाली की तीचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही.
शेखर कपूर यांनी मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीच प्रतिक्रिया दिली नाही. शेखरचे नाव केवळ प्रीती झिंटाबरोबरच नाही तर अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशीही जोडले गेले होते. शबाना आणि शेखर यांनी बर्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. शेखरने ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. शेखरदेखील शबाना आझमीच्या सोबत या चित्रपटात होते. यावेळी दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली होती. अशा चर्चा होत्या की या दोघांचे अफेअर हे जवळपास नऊ वर्षे चाललं होतं.