हिंदी चित्रपट जगतात असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये खऱ्या आयुष्यातील बाप लेकांनी पडद्यावरही वडील आणि मुलाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. रागीट वडील आणि खोडकर मुलाच्या या पडद्यावरील जोड्या प्रेक्षकांनाही खूप आवडल्या. वेळोवेळी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये वडील आणि मुलाचे नाते चांगले दाखवण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये कपूर घराण्यापासून ते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या जोडीला लोकांनी चांगलीच पसंती दिली आहे. चला तर मग आज जाणून घेऊया OTT वर सध्या कोणते पिता-पुत्रांचे गाजलेले चित्रपट उपलब्ध आहेत.
मुन्ना भाई एमबीबीएस (Amazon Prime Video)
‘मुन्ना भाई एमबीबीएस’ हा २००३ मधील विनोदी नाटक आहे. याचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. विधू विनोद चोप्रा निर्मित या चित्रपटात संजय दत्त, अर्शद वारसी, सुनील दत्त, ग्रेसी सिंग, बोमन इराणी, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात मुन्ना (संजय दत्त) हा गुंडा आहे, जो आपल्या वडिलांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघतो. त्याचा मित्र सर्किटच्या (अर्शद वारसी) मदतीने तो मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतो आणि इथूनच कथेतील ट्विस्ट सुरू होतो.
बंटी और बबली (Amazon Prime Video)
‘बंटी और बबली’ हा २००२ साली प्रदर्शित झालेला क्राईम कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन शाद अली यांनी केले आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात बंटीची भूमिका अभिषेक बच्चन आणि बबलीची भूमिका राणी मुखर्जीने केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दशरथ सिंग या पोलिसाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट दोन गुंडांच्या कथेवर आधारित आहे.
बेशरम (ZEE5)
चित्रपटाची कथा बबली (रणबीर कपूर) भोवती फिरते. तो चोर आहे आणि गाड्या चोरत असतो. मात्र तारा (पल्लवी शारदा) नावाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या आयुष्यात एक रंजक वळण येते. त्यानंतर तो सुधारण्याचा निर्णय घेतो. या चित्रपटात ऋषी कपूर आणि नीतू कपूर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते.
क्रिश (Sony Liv)
‘क्रिश’ हा राकेश रोशन दिग्दर्शित २००६चा एक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा, रेखा प्रमुख भूमिकेत होत्या. हा सिनेमा ‘कोई मिल गया’चा सिक्वेल म्हणून तयार करण्यात आला होता. वडिलांकडून अलौकिक शक्तींचा वारसा लाभलेल्या रोहित मेहराची ही कथा आहे. हा २००६ सालचा सर्वात हिट चित्रपट होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा