Saturday, March 7, 2026
Home बॉलीवूड भावाकडे रागाने पाहणारी ‘ही’ चिमुकली आज आहे आघाडीची नायिका, ओळखलं का तुम्ही?

भावाकडे रागाने पाहणारी ‘ही’ चिमुकली आज आहे आघाडीची नायिका, ओळखलं का तुम्ही?

सोशल मीडिया आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढत जाणारे माध्यम आहे. या माध्यमाने अनेक सामान्य लोकांना स्टार बनवत, लोकप्रियता मिळवून दिली आहे. आज मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना सोशल मीडियावर अमाप लोकप्रियता मिळाली आणि मग ते मनोरंजनविश्वात आले आणि त्यांनी त्यांचे करिअर घडवले. सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे, जिथे रोज काहीतरी ट्रेंड होत असते. आजकाल, बॉलिवूड सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहेत. ज्यांना युजर्सला ओळखण्याचे आव्हान दिले जात आहे. अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. ज्याला युजर्स ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक मुलगी तिच्या वडील आणि भावासोबत दिसत आहे. फोटोत दिसणारी ही मुलगी आजच्या काळातील बॉलिवूडची यशस्वी आणि क्यूट अभिनेत्री आहे.

फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी, जी तिच्या भावाकडे रागाने पाहत आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून, लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आहे. होय, जिनिलियानेच काही वेळापूर्वी हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. फादर्स डेच्या दिवशी जिनिलियाने तिच्या वडिलांना ‘हॅपी फादर्स डे’च्या शुभेच्छा देताना हा फोटो शेअर केला. तिच्या या पोस्टवर युजर्सच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यावर तिने क्यूट, सुंदर, सुंदर फोटो अशा कमेंट्स केल्या.

जिनिलिया देशमुखबद्दल बोलायचे झाले, तर तिने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, मराठी आणि तेलुगु चित्रपटात काम केले आहे. रितेश देशमुख विरुद्ध ‘तुझे मेरी कसम’ हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता. जिनिलियाने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

रितेश देखमुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाले, तर रितेश लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. रितेश देशमुखचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बागी ३’ होता. जिनिलियाबद्दल बोलायचं झालं, तर ती लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांना आपला सर्व वेळ देत चित्रपटांपासून लांब गेली आहे. जिनिलिया शेवटची ‘फोर्स २’ मध्ये दिसली होती. जिनिलिया आणि रितेश यांना रियान आणि राहिल नावाची दोन मुले आहेत. बऱ्याचवेळा त्यांचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा