Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘या’ जगप्रसिद्ध डान्सर, गायक असणाऱ्या कलाकाराचे वयाच्या २५ व्या वर्षी दुःखद निधन

एस्ट्रो मेंबर मुनबीनचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन झाले आहे. दक्षिण कोरियाई आऊटलेटने याबाबत बातम्या दिल्या आहेत. कोरियाबूच्या एका रिपोर्टनुसार के-पॉप आयडल सियोलच्या गंगनम-गु मध्ये त्याच्या अपार्टमेंटमध्ये मुनबीन मृतावस्थेत आढळला आहे. योनहाप न्यूज टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार साऊथ कोरियाई एंटरटेनमेंट पोर्टलने सांगितले की, पोळी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुनबीनने आत्महत्या केली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाची ऑटोप्सी करण्याचा विचार पोलीस करत आहे.

आंतरराष्ट्रीय रिपोर्टच्या म्हणण्यानुसार मुनबीन १९ एप्रिल २०२३ रोजी रात्री ८.१० मिनिटांनी त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याच्या मॅनेजरने त्याला प्रथम पहिले आणि पोलिसांना माहिती दिली. मुनबीनच्या फैंटेगियो एजन्सीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. अजून मुनबीनच्या मृत्यूच्या अधिकृत माहितीसाठी जरी अजून कोणी समोर आलेले नसले तरी त्याचे फॅन्स मात्र आता मोठ्या धक्क्यात असून, त्याच्या अचानक झालेल्या या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहे.

मुनबीनने सान्हाच्या एस्ट्रो यूनिट ग्रुपसोबत त्याचे कमबॅक केले होते. तो एका फॅनकॉन टूरला होस्ट देखील करणार होता. मात्र या तुरीच्या आयोजकांनी आता एक स्टेटमेंट जरी केले असून त्यात सांगितले आहे की, “जड अंतकरणाने आम्हला हे सांगावे लागत आहे की, २०२३ मुनबॉन अँड सान्हा फॅनकॉन टूर १३ मे रोजी जकार्ता इथे होणारी टुर रद्द केली आहे. खूप मोठ्या चर्चेनंतर आणि विचारानंतर काही हाताबाहेर असलेल्या परिस्थितींमुळे आम्हाला हा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! यश चोप्रा यांच्या पत्नी आणि जेष्ठ गायिका पामेला चोप्रा यांचे निधन

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊसवर आणि निर्मात्यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाची छापेमारी

हे देखील वाचा