×

मृत्यूच्या २ वर्षानंतर बनवली गेली होती ‘त्या’ अभिनेत्रीची पेंटिंग, आज १५०० कोटीत झाला लिलाव; पण का?

जगभरात आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत असलेली हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरो (Marilyn Monroe) हिचे एक पोर्ट्रेट तब्बल १५०० कोटी रुपयांना विकले गेले आहे. ही बातमी इंटरनेटवर आगीसारखी पसरत आहे. खरंतर, अभिनेत्रीची ही पेंटिंग १९६४ साली बनवण्यात आली होती, ज्याचा लिलाव झाला आहे.

लिलावात विकली गेलेली मर्लिन मुनरोची पेंटिंग साल १९६४ मध्ये बनवण्यात आली होती. हा लिलाव क्रिस्टीजने केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या लिलावात कोणीतरी मर्लिन मुनरोचे ते ६८ वर्ष जुने पेंटिंग विकत घेतले आहे. असे म्हटले जात आहे की, मर्लिन मुनरोची पेंटिंग ही आतापर्यंत खरेदी केलेली सर्वात महागडे अमेरिकन आर्ट आहे. (this hollywood actress died 60 years before now her 1 picture sell for 1500 crore)

View this post on Instagram

A post shared by Marilyn Monroe (@marilynmonroe)

मर्लिन मुनरोच्या पेंटिंगमध्ये काय आहे विशेष?
दरम्यान, मर्लिन मुनरोचे पेंटिंग १५०० कोटी रुपयांना कोणी विकत घेतले, याची माहिती मिळू शकली नाही. मर्लिन मुनरोच्या या पेंटिंगला ‘शॉट सेज ब्लू मर्लिन’ म्हणतात, जे अँडी वॉरहोलने १९६४ मध्ये तयार केले होते. अँडीने ते बनवण्यासाठी ५ वेगवेगळ्या रंगसंगती वापरल्या. विशेष बाब म्हणजे, हे पेंटिंग मर्लिनच्या मृत्यूनंतर २ वर्षांनी बनवण्यात आले होते. तिचे हे पोर्ट्रेट मर्लिनच्या ‘नायगारा’ चित्रपटाच्या पोस्टरसारखे आहे.

आतापर्यंत ‘या’ व्यक्तीकडे होती मर्लिनची पेंटिंग
आत्तापर्यंत मर्लिनची ही पेंटिंग स्विस आर्ट डीलर फॅमिली ‘द अम्मान्स’कडे होती. १९८० सालापासून ही पेंटिंग त्यांच्याकडेच होती. तसेच, या पेंटिंगचे पैसे चॅरिटीला दिले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेंटिंग विकून मिळालेले पैसे मुलांच्या शिक्षण आणि आरोग्य कार्यक्रमासाठी दान केले जातील. मर्लिन मुनरोची ही पेंटिंग लिलावात विकली गेलेली सर्वात महागडी पेंटिंग आहे.

मर्लिनबद्दल बोलायचे झाले, तर ती तिच्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक होती. ती तिच्या सौंदर्यासाठी आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध होती. पण मर्लिनचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले.

Latest Post