Saturday, June 29, 2024

तर अक्षय कुमारच्या ‘या’ गोष्टीमुळे इंम्प्रेस झाली ट्विंकल खन्ना आणि म्हणाली लग्नाला हो

अभिनेत्री ट्विंकल खन्ना ही तिच्या अभिनयापेक्षा अधिक तिच्या लिखाणामुळे आणि तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. जास्त सार्वजनिक ठिकाणी न दिसणारी ट्विंकल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. एक उत्तम आणि लोकप्रिय कॉलम आर्टिस्ट म्हणून देखील ट्विंकलची ओळख आहे. एका मोठ्या वृत्तपत्रात ती कॉलम लिहिते. नुकतेच तिने तिच्या कॉलमच्या माध्यमातून तिच्या आणि अक्षय कुमारच्या प्रेमकहाणीला उजाळा दिला आहे.

ट्विंकल खन्नाने तिच्या कॉलममध्ये लिहिले, “आळसाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा कधीतरी त्याला जवळ केले पाहिजे. दुसरीकडे मी खूपच आळशी झाली होती. एयरपोर्टवर अनेक तास मी लोकंची गर्दी निहाळण्यात घालवायची. याच कारणामुळे मी काही काळाने माझ्या सहकलाकार असलेल्या अक्षय कुमारसोबत मी जॉगिंग करायला लागली पुढे जाऊन आमचे लग्न झाले आणि आता दोन पळणारे मुलं देखील आहेत. जॉगिंगला सोबत गाणाऱ्या ट्विंकलला अक्षयचे स्पोर्ट्स लूक आवडले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

अक्षय आणि ट्विंकलने १९९९ साली ‘इंटरनॅशनल खिलाडी’ आणि ‘जुलमी’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी अनेक वर्ष डेट केले. अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी विचारल्यावर ती म्हणाली, “जर माझा ‘मेला’ सिनेमा फ्लॉप ठरला तर मी तुझ्याशी लग्न करेल.” पुढे झाले असेच मेला फ्लॉप गेला आणि त्यांनी २००१ साली लग्न केले. त्यांना आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत.

ट्विंकलला अक्षयमध्ये असलेला हजरजबाबीपणा खूप आवडतो. याबात तिने एक किस्सा सांगितलं होता की, “मी त्याच्यासोबत पाचव्या डेटला गेली होती. मी त्याला सहज म्हणाले, “मी तुझ्यासारख्या व्यक्तीसोबत कधीच लग्न करणार नाही. यावर तो लगेच मला म्हणाला, पण मला आठवत नाही की, मी तुझ्याशी लग्नाचे कधी बोललो आहे.” त्याची हीच बाब ट्विंकलला जास्त आवडते. अक्षय आणि ट्विंकलने इंटरनॅशनल खिलाडी आणि जुलमी या चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतकार रिकी केज यांनी तिसऱ्यांदा पटकावला ग्रॅमी पुरस्कार, ट्विट करत सन्मान केला देशाला समर्पित
शाहरुखने कर्नल लूथराच्या पत्नीसोबतच केलं फ्लर्ट; थेट सोशल मीडियावरच म्हणाला, ‘टॉप सिक्रेट..’

हे देखील वाचा