Saturday, June 29, 2024

‘या’ चित्रपटांमधून घडले भाऊ-बहिणीच्या ‘स्पेशल’ नात्याचे दर्शन; पाहिले नसतील तर एकदा पाहाच

भाऊ बहिणीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अगदी असेच बहीण भावाचे नाते असते. कितीही भांडणं झाली तरी कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारे. भाऊ आणि बहिणीचे नाते अत्यंत पवित्र असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर भाऊ आणि बहिणीच्या प्रेमावर बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम चित्रपट देखील बनले आहेत. ज्यात दोघांच्या या पवित्र नात्याचे सौंदर्य खूप छान दाखवण्यात आले आहे. याच सुंदर नात्याला बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्ये अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल.

 

दिल धडकने दो :

हा चित्रपट लोकांना खूप आवडला. कौटुंबिक कथेवर आधारित असणाऱ्या या सिनेमात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्राने यांनी बहीण भावाची भूमिका साकारली होती. हे भाऊ-बहिणी प्रतिकूल परिस्थितीतही एकमेकांसोबत कसे उभे राहतात, एकमेकांच्या निर्णयाला पाठिंबा देखील देतात.

 

काई पो चे :

या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट मुख्यतः मैत्रीवर आधारित असला तरी यामध्ये भाऊ आणि बहीण यांच्यातील सुंदर नातेसंबंधाचे चित्रण दाखवण्यात आले होते.

क्वीन :

या चित्रपटात कंगना राणावतने मुख्य भूमिका साकारली असून तिच्या भावाने या चित्रपटात बहिणीची काळजी घेणाऱ्या भावाची भूमिका साकारली आहे.

इक्बाल :

या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि श्रेयस तळपदे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. श्रेयसला क्रिकेटर बनायचे असते, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची बहिण प्रत्येक टप्प्यावर त्याला कशी मदत करते. अतिशय आकर्षक आणि भावनिक पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

नो वन किल्ड जेसिका :

हा सिनेमा जरी भावा-बहिणीवर आधारित नसला तरी या सिनेमात दोन बहिणींमधले नाते यात दाखवले आहे. आपल्या बहिणीला न्याय मिळावा यासाठी दुसरीचे शर्थीचे प्रयत्न देखील यात दाखवले आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा