‘या’ कारणासाठी गोविंदाने केले होते पत्नी सुनीताशी दुसऱ्यांदा लग्न!


उत्तम डान्सर, उत्तम अभिनेता असणारा अभिनेता गोविंद अहुजा याचा आज वाढदिवस. गोविंदा ने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग त्याने निर्माण केला. कारण त्यावेळी प्रतिस्पर्धी खूप होते. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त इतरही कलागुण असणं आवश्यक होतं. हीच बाब गोविंदाकडे नेमकी होती. बॉलिवूड दिग्दर्शकांनी त्याला संधी दिली. गोविंदाचे चुलते आनंद सिंह हे स्वतः बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक आणी निर्माते होते. गोविंदाने ‘तन बदन’ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज आपल्या सर्वांचा लाडका गोविंदा हा ५७ वर्षांचा झाला आहे. आपल्याला माहीत आहे का की गोविंदाने चार वर्षे त्याच लग्न हे जगापाऊन लपवून ठेवलं. त्याने असं का केलं होतं याबद्दलच आज आपण वाचूयात.

‘तनबदन’ सिनेमाच्या काही काळानंतर गोविंदा हा काका आनंद यांची मेहुणी सुनीता मुंजाळ यांच्या प्रेमात पडला आणि दोघांनी गुप्तपणे लग्न केले. दोन लग्नांमुळे इंडस्ट्रीतील अनेक लोक चर्चेत येत असताना, गोविंदा हे एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी लग्नाच्या १८ वर्षानंतर स्वत: च्या पत्नीबरोबर सर्व परंपरा पाळून पुन्हा लग्न केलं… चला जाणून घेऊया या लग्नाचं कारण काय होतं.

गोविंदाने २०१५ मध्ये पत्नी सुनीताशी पुन्हा एकदा लग्न केलं. हे त्याने ‘आप की अदालत’ या मुलाखतीमध्ये सांगितलं. वयाच्या ४९ व्या वर्षी गोविंदाने पुन्हा लग्न करावं अशी त्याची आई निर्मला देवी यांची इच्छा होती. गोविंदाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी ११ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी पत्नी सुनीता मुंजाळ यांच्याशी पुन्हा लग्न केले. ज्यात त्यांची मुलं टीना आहूजा आणि यशवर्धनही उपस्थित होते.

सुनीता ही गोविंदाचे काका आनंद सिंग यांची मेहुणी होती. दोघेही काही भेटीनंतरच एकमेकांवर मनापासून प्रेम करत होती. एके दिवशी पार्टीमधून परतताना गोविंदाच्या हाताचा चुकून सुनीताच्या हाताला स्पर्श झाला परंतु त्या दोघांनीही आपला हात काही बाजूला सारला नाही आणि अशा प्रकारे दोघांनीही एकमेकांच्या प्रेमास सहमती दर्शविली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ११ डिसेंबर १९८७ रोजी गोविंदा आणि सुनीताचं लग्न झालं.

ज्या वेळी गोविंदा आणि सुनीताने लग्न केलं होतं, त्या वेळी गोविंदाची कारकीर्द स्थिर नव्हती, म्हणून दोघांनीही लग्न केलं खरं परंतु ही गोष्ट संपूर्ण जगापासून लपवून ठेवली. नंतर जेव्हा गोविंदाने सर्वांना आपल्या लग्नाविषयी सांगितलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

गोविंदाने ३४ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत कुली नंबर १, हिरो नंबर १, राजा बाबू, अखियोंसे गोली मारे, या सारखे अनेक सुपर हिट सिनेमे दिलेले आहेत. सध्याच्या घडीला गोविंदाला बॉलिवूड मध्ये हिरो नंबर १ आणि चिची या नावाने देखील ओळखलं जातं.


Leave A Reply

Your email address will not be published.