Tuesday, March 5, 2024

‘करण-अर्जुन’ सिनेमासाठी सलमान खान नाही तर ‘हा’ सुपरस्टार होता पहिली पसंत, राकेश रोशन यांचा खुलासा

बॉलिवूडमधील एक तुफान हिट झालेला सिनेमा म्हणजे ‘करण अर्जुन’. सलमान आणि शाहरुख खान यांच्या करियरला एक उंची देणारा, त्यांच्यातील अभिनेत्याचा एक वेळगे पैलू लोकांसमोर आणणारा सिनेमा म्हणून या चित्रपटाला ओळखले जाते. या सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या करियरमधील एक उत्तम सिनेमा म्हणून करण अर्जुन चित्रपटाची ओळख आहे. याच सिनेमाशी संबंधित एक गुपित नुकतेच त्यांनी सर्वांना सांगितले. 

राकेश रोशन यांनी जे गुपित सांगितले ते ऐकून सर्वच दंग होतील. आज करण अर्जुन नाव उच्चारले तरी सलमान आणि शाहरुख हे दोघंच समोर येतात. त्यांनी या सिनेमाला आपल्या दमदार अभिनयाने अजरामर केले. मात्र या सिनेमासाठी आधी सलमान खान पहिली पसंती नव्हता. ही भूमिका आधी दुसऱ्या एका अभिनेत्याला ऑफर झाली होती, मात्र त्याने ती नाकारल्यानंतर सलमानला ती मिळाली.

काही दिवसांपूर्वीच राकेश रोशन यांनी टीव्हीवरील एका लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये हजेरी लावली या वेळी त्यांनी त्यांच्या चित्रपटांशी संबंधित अनेक किस्से आणि माहिती सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की या सिनेमाचे नाव आधी ‘कायनात’ असे ठेवण्याचे ठरले होते. यात जी भूमिका सलमान खानने केली आहे, ती आधी अजय देवगनला ऑफर झाली होती, मात्र त्याने नकार दिल्यांनतर ही भूमिका सलमानकडे गेली.

करण अर्जुन सिनेमात सलमान खान आणि शाहरुख खान यांनी दमदार भूमिका साकारली असून, हा सिनेमा एका पुनर्जन्मावर आधारित आहे. यात सलमान शाहरुखसोबतच राखी, काजोल आणि ममता कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

हे देखील वाचा