Friday, November 22, 2024
Home वेबसिरीज किस्से बॉलिवूडचे! ‘या’ अभिनेत्रीने आई होण्यासाठी १४ वेळा केले प्रयत्न; पडद्यामागच्या गोष्टींमुळे नेहमीच राहिली चर्चेत

किस्से बॉलिवूडचे! ‘या’ अभिनेत्रीने आई होण्यासाठी १४ वेळा केले प्रयत्न; पडद्यामागच्या गोष्टींमुळे नेहमीच राहिली चर्चेत

बॉलीवूडची मादक सौंदर्यवती म्हणून कश्मिरा शहा प्रसिद्ध आहे. २ डिसेंबर १९७१ मध्ये कश्मिराचा मुंबईत जन्म झाला. कश्मिरा मनोरंजन क्षेत्रात तिचा बोल्ड अभिनय आणि नृत्यासाठी विख्यात आहे. कश्मिराने मॉडेलिंग सुद्धा केली आहे. काश्मिराने गोविंदाचा भाचा आणि प्रसिद्ध कॉमेडीयन कृष्णा अभिषेक सोबत २०१२ मध्ये लग्न केले. तत्पूर्वी कश्मिराने हॉलिवूड मधील ब्रैड लिस्टरमैन या निर्मात्यासोबाबत लग्न केले होते. लग्नाच्या ६ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.

त्यानंतर काश्मिराने पुन्हा आपला मोर्चा हिंदी सिनेमांकडे वळवला. एक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस तिची आणि कृष्णाची जयपूरमध्ये भेट झाली. कृष्णाच्या मनात सुरवातीपासूनच कश्मिराबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर होताच. घटस्फोटामुळे कश्मिरा वैयक्तिक आयुष्यात तणावाखाली होती. त्याचवेळेस कृष्णाने तिला आधार देत तणावातून बाहेर पडायला मदत केली. तेव्हाच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. बरीच वर्ष लिव्ह इन मध्ये राहून त्यांनी अखेर २०१२ ला लग्न केले.

कश्मिरा आणि अभिषेक हे सरोगेसी पद्धतीचा वापर करून २०१७ मध्ये जुळ्या मुलांचे आई वडील झाले. याबद्दल काश्मिराने एक मुलाखतीमध्ये सांगितले की, लग्नानंतर आम्ही फॅमिली प्लनिंग केले. त्यासाठी मी माझे काम देखील काही काळासाठी थांबवले. मात्र मला प्रेग्नेंसी राहत नव्हती. यात माझे वजन खूप जास्त वाढले. मला अनेक लोकांनी सांगितले की वजन वाढल्यामुळे मी प्रेग्नेंट होऊ शकत नसेन. मात्र मी हार मानली नाही. IVF (In Vitro Fertilization)  या तंत्रण्याचा वापर करून आम्ही आमच्या मुलांना जन्म दिला. दरम्यन मी १४ वेळा प्रेग्नेंट होण्यासाठी अपयशी झाली होती, याचा माझ्या शरीरावर खूप वाईट परिणाम झाला होता. पण ते म्हणतात ना ‘ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड’. असाच विचार मी आता करते. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे.

काश्मिराने आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यात येस बॉस, शिकारी, दुल्हन हम ले जायेंगे, वेक अप सिद, कही प्यार ना हो जाये, वास्तव, आव्हान आदी चित्रपटांचा समावेश आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा