[rank_math_breadcrumb]

दुःखद! ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचे निधन वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध आणि लोकप्रिय एनएफएल हॉल ऑफ फेमर आणि अभिनेता जिम ब्राऊन यांचे निधन झाले आहे. ‘द डर्टी डजन’, ‘आई स्पाई’, ‘ड्राफ्ट डे’, ‘मार्स अटैक!’ आणि ‘ए-टीम’ आदी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. १८ मे रोजी लॉस एंजलिसमध्ये त्यांनी त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी पत्नी असलेल्या मोनिक ब्राऊन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जिम यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

मोनिक ब्राऊन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “जिम यांचे शांतिपूर्व निधन झाले आहे.” ब्राऊन यांना आतापर्यंतच्या सर्वात जास्त प्रतिभावान असे फुटबॉल खेळाडू देखील समजले जायचे. १९६४ साली त्यांनी रिचर्ड बून यांच्या ‘रियो कोंचोस’ सिनेमातून जेव्हा चित्रपटांमध्ये पदार्पण केले तेव्हा देखील ते फुटबॉल खेळायचे. एनएफएल मधून निवृत्ती घेतल्यानंतर ते १९६७ साली आलेल्या बिल कॉस्बी आणि रॉबर्ट कल्प यांची एक्शन सिरीज असलेल्या ‘आई स्पाई’च्या एका भागात देखील दिसले होते. या भागात त्यांची महत्वाची भूमिका होती. जी स्टार-पॅक असणाऱ्या दुसऱ्या महायुद्धावर आधारित एक्शन-एडवेंचर ‘द डर्टी डोजेन’ मध्ये होती.

जिम ब्राऊन यांनी चित्रपटांसोबतच टीव्हीवर देखील काम केले. त्यांनी 1969 मध्ये आलेल्या ‘वेस्टर्न 100 राइफल्स’ मध्ये रैक्वेल वेल्च सोबत इंटिमेट सीन केला होता. असे करणारे ते पाहिले अश्वेत व्यक्ती होते.हॉलिवूडमध्ये स्थान मिळवल्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. २०१० सालापर्यंत ते चित्रपटांसोबत टीव्हीवर देखील पाहुणे म्हणून जायचे. २०१४ साली जिम ‘ड्राफ्ट डे’ मध्ये दिसले होते. जिम ब्राऊन यांच्या निधनानंतर हॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण आहे. त्यांना फुटबॉल इंडस्ट्रीसोबतच मनोरंजनविश्वातून देखील श्रद्धांजली वहिती जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव