Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड ओळखा पाहू कोण? फोटोमधला ‘हा’ चिमुकला सध्या वाजवतोय बॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका

ओळखा पाहू कोण? फोटोमधला ‘हा’ चिमुकला सध्या वाजवतोय बॉलिवूडमध्ये अभिनयाचा डंका

प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडीच्या कलाकाराविषयी सर्व माहिती ठेवणे फार आवडते. अशात कलाकारांच्या आयुष्यातील अगदी बालपणापासूनची माहिती काही चाहते ठेवत असतात. कलाकारांचे बालपण, त्यांच्या आयुष्यातील जोडीदार, त्यांचे राहणीमान या सर्व गोष्टींची माहिती ठेवत, अनेकजण काही कलाकारांचा आदर्श घेत देखील पुढे जात असतात. अशात सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये दिसणारा हा लहान मुलगा सध्याचा एक आघाडीचा कलाकार आहे.

या फोटोला अनेकांनी आपआपल्या आवडीच्या कलाकाराचे नाव जोडले. अशात हा नेमका कोणत्या कलाकाराचा फोटो आहे? अशा प्रश्नांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. तर मंडळी तुम्ही देखील आतापर्यंत ओळखू शकले नसाल, तर तुमच्या माहिती साठी सांगतो. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसुन बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार आहे. त्याच्या या फोटोवर चाहते खूप प्रेम करताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर हार्ट ईमोजींचा वर्षाव केला आहे. अक्षयच्या बालपणीच्या फोटोमध्ये चाहते खूप खुश आहेत. त्याचा फोटो पाहून सर्वांनाच आपल्या बालपणीची आठवण येत आहे. (this little child is the busiest bollywood star today can you guess his name)

अक्षयच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास नुकताच तो ‘बेल बॉटम’ चित्रपटात झळकला होता. तसेच तो ‘अतरंगी रे’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘सूर्यवंशी’, ‘रामसेतु’ आणि ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

नुकतेच त्याच्या आईचे निधन झाले. त्यावेळी तो खूप दुःखी होता. त्याने आजवर अनेक सामाजिक संदेश देणारे चित्रपट देखील केले आहेत. त्याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिना खानचा ब्रेकअप? अभिनेत्रीच्या लेटेस्ट पोस्टमुळे चाहते पडले चिंतेत

-आर्यन खानला सकाळी ७ वाजता मिळणार जेलमधील जेवण, ‘या’ गोष्टीसाठी तरसणार शाहरुखचा मुलगा

-‘हे नक्की शाल्विताच का?’ ओम अन् स्वीटूच्या ‘त्या’ व्हिडिओवर रंगल्यात चाहत्यांच्या चर्चा

हे देखील वाचा