हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ६० आणि ७० चे दशक गाजवलेल्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आजही त्यांच्या सहजसुंदर अभिनयासाठी ओळखल्या जातात. यापैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे माला सिन्हा होय. सदाबहार अभिनेत्री माला गुरुवारी (११ नोव्हेंबर) आपला ८५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना ‘अनपढ़’, ‘आँखे’, ‘धूल का फूल’, ‘दो कलियां’ आणि ‘हिमालय की गोद’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. नेहमीच प्रसिद्ध कलाकारांचे जुने फोटो व्हायरल होत असतात. अशातच माला यांचाही असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या फोटोत बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेताही दिसत आहे. मात्र, तो त्याचा बालपणीचा फोटो आहे.
खरं तर, व्हायरल होत असलेल्या या फोटोत माला सिन्हा यांच्यासोबत फोटोत दिसणारा चिमुकला मुलगा इतर कोणी नसून बॉलिवूड सुपरस्टार बॉबी देओल आहे. हा फोटो काही काळापूर्वी धर्मेंद्र यांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. या ब्लॅक अँड फोटोत बॉबी देओल माला सिन्हा यांच्या कुशीत दिसत आहे. (This Little Kid In Mala Sinha Lap Become Bolltywood Action Hero See His Name)
#OnThisDay Happy 85th birthday #MalaSinha ji.
In this photo, she is with #BobbyDeol.
What are your favorite Mala Sinha movies?@aapkadharam @thedeol @iamsunnydeol pic.twitter.com/D4OWJa9xs9
— Bollywoodirect (@Bollywoodirect) November 11, 2021
माला सिन्हा यांच्याबाबत बोलायचं झालं, तर त्यांचे खरे नाव हे आल्दा सिन्हा असे आहे. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर, १९३६ रोजी कोलकाता येथे झाला होता. माला यांनी हिंदी, बंगालीसह नेपाळी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांना गुरुदत्त यांच्या ‘प्यासा’ आणि ‘धूल का फूल’ या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळाली होती. विशेष म्हणजे, माला यांनी बहुतकरून महिला केंद्रित चित्रपटांमध्ये काम केले आणि नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
माला सिन्हा यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्या ‘जय वैष्णो देवी’ या बंगाली चित्रपटात झळकल्या होत्या. माला यांनी ऑल इंडिया रेडिओसाठी गायनही केले होते. मात्र, गीता बाली यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळण्याची संधी दिली. अशाप्रकारे माला यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाने आपली एक वेगळीच छाप सोडली.
बॉबी देओलबद्दल बोलायचं झालं, तर तो शेवटचा ‘आश्रम’ या वेबसीरिजमध्ये दिसला होता. आता तो ‘हाऊसफुल ५’ आणि ‘ऍनिमल’ यांसारख्या आगामी चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…