कलाकार अनेकदा अभिनयाव्यतिरिक्त आणि शूटिंगव्यतिरिक्त त्यांना मिळालेल्या फावल्या वेळात विविध गोष्टी करताना दिसतात. आजच्या सोशल मीडियाच्या काळात तर कलाकार त्यांच्या या सर्व वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या फॅन्ससोबत शेअर देखील करताना दिसतात. कोणी आराम करते, कोणी फिरायला जातात, कोणी व्यायाम करतात, कोणी शॉपिंग करतात तर कोणी त्यांचे स्वयंपाकाचे कौशल्य दाखवतात. मग आता अभिनेत्री आणि अभिनेता असा दुजाभाव अजिबातच नसतो.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्याची पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे, ज्यांनी चक्क त्याला मिळालेल्या वेळात चारी ठाव स्वयंपाक करत घरच्यांना खुश केले आहे. हा अभिनेता आहे मराठी मनोरंजनविश्वातील अष्टपैलू कलाकार जितेंद्र जोशी अर्थात जितू दादा. जितेंद्र जोशी त्याच्या प्रभावी अभिनयासोबतच उत्तम लिखाणासाठी आणि कवितांसाठी ओळखला जातो.
View this post on Instagram
जितेंद्रने त्याच्या प्रतिभेच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. जितूने चक्क त्याला मिळालेल्या वेळात त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवले आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन देखील लिहिले आहे.
जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्यासाठी स्वयंपाक तयार करणे हे तर विपश्यने सारखेच आहे. जेवण बनवताना मी पदार्थ, चव, रंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम या गोष्टींना व्यवस्थित हाताळतो. जेव्हा माझी आई, पत्नी, मुलगी, काम करणारी मावशी आणि मित्र ते खाऊन तृप्त होतात. मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो तेव्हा मला विशेष वाटते. त्यामुळे मी आशा करतो आणि देवाला प्रार्थना करतो की या पृथ्वीवरील प्रत्येकाला त्यांच्या हक्काचे अन्न मिळावे. अन्न हे पूर्ण ब्रह्म!!! देव महान आहे!!”,
दरम्यान जितेंद्र जोशींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्याच्या या कौशल्याची वाहवा केली आहे. अश्विनी भावेने लिहिले, “मी स्वतःच स्वतःला आमंत्रित करू का?”, तर नीना कुलकर्णी यांनी लिहिले आहे, “गोदावरीच्या चित्रीकरणावेळी ही टॅलेंट माहीत असती तर तुला स्वयंपाकघरातच कोंडून ठेवले असते !” सध्या जितू दाच्या या पोस्टची खूपच चर्चा होताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शशांक केतकरने दिली भारतीयांना लंडनमध्ये जॉबची संधी; मिळणार २८ लाख पगार, व्हिडिओ शेअर करत म्हणाला…