यावर्षी मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराईचा मौसम आल्याचे चित्र दिसत आहे. अनेक कलाकारांनी यावर्षी लगीनगाठ बांधली तर काहींनी साखरपुडा केला आहे. नुकताच मराठी मालिका विश्वातील गाजलेली जोडी असलेल्या संकेत पाठक आणि सुपर्ण श्याम यांनी नुकतेच दणक्यात लग्न केले आता त्यांच्या नंतर अजून एक लोकप्रिय जोडीने आपला साखरपुडा केला आहे. अभिनेता असलेल्या ऋषी मनोहरने त्याची मैत्रीण असलेल्या तन्मयी पेंडसेंसोबत साखरपुडा केला आहे. त्याच्या या साखरपुड्याला प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत इंडस्ट्रीमधील इतर अनेक कलाकार उपस्थित होते.
View this post on Instagram
ऋषी मनोहरने तन्मयीला काही दिवसांपूर्वीच अधिकृतपणे लग्नाची मागणी घातली होती. तिचा होकार आल्यानंतर आता ऋषीने तन्मयीसोबत साखरपुडा केला आहे. ऋषीला आपण अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये काम करताना पाहिले असून, तो सध्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकात दिसत आहे. याच नाटकाच्या माध्यमातून त्याने व्यवसायिक नाटकांमध्ये पदार्पण केले आहे. ऋषीने पुरोशत्तम करंडक आणि फिरोदिया करंडकमध्ये अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे.
ऋषीने ‘एका काळेचे मनी’ या वेबसिरीजमध्ये त्याने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. लवकरच त्याचा अभिनय असलेला ‘कन्नी’ हा त्याचा मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. दरम्यान ऋषींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्याची आई पौर्णिमा मनोहर या देखील मराठी मनोरंजनविश्वात दिग्गज अभिनेत्री आहे, तर वडील क्रिकेटर आहे. ‘पेट पुराण’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘चिंटू’, ‘तुझा माझा जमेना’, ‘पांडू’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ऋषी एक उत्तम दिग्दर्शक देखील असून, त्याने अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्या फॅन्सला ऋषी आणि तन्मयी यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध संगीत कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्यावर मंदिरातून बाहेर येताच झाडल्या होत्या १६ गोळ्या, वाचा त्यांची कहाणी
एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे आपला आत्मविश्वास गमावून बसला होता “हा” विनोदी अभिनेता










