Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

“माझ्यावर ४ गुंडांनी हल्ला केला” म्हणत ‘या’ मराठी अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल

मराठी मनोरंजनविश्वातील बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो उत्तम लेखक, सूत्रसंचालक आणि कवी देखील आहे. अनेक उत्तम मालिका आणि नाटकांमधून त्याने त्याच्या अभिनयाची आणि लेखनाची झलक दाखवली आहे. सोशल मीडियावरही तो कमालीचा सक्रिय आहे. मात्र त्याचा कल हा जास्त नाटकांकडेच दिसतो. संकर्षणचा सोशल मीडियावरील वावर देखील चांगलाच आहे. तो सतत या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असतो. सोबतच या माध्यमातून तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल देखील माहिती देत असतो.

संकर्षणने आधी दिलेल्या माहितीनुसार तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या आगामी ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी गेला आहे. तिथून त्याने एक पोस्ट शेअर केली असून जी सध्या कमालीची चर्चेत आली आहे. त्याने त्याच्या पोस्टसोबत जो फोटो शेअर केला आहे तो खूपच गाजत आहे. संकर्षणने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हाताला लागलेले दिसत आहे.

संकर्षणने त्याच्या या फोटोसोबत जे कॅप्शन दिले आहे त्यात त्याने लिहिले, “परवा रात्री माझ्यावर ४ (चार) गुंडांनी हल्ला केला. मी त्यांच्याशी २ (दोन) हात केले. त्यात माझा १ (एक) हात जखमी झाला. याची तुम्हाला ० (शुन्य) कल्पना होती. म्हणून हा फोटो पोस्ट करत आहे”. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला असून, सोबतच त्याने अशी पोस्ट का शेअर केली हे देखील विचारले आहे.

अनेकांनी संकर्षणने शेअर केलेली पोस्ट ही त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सचे प्रमोशन असल्याचे सांगितले आहे. संकर्षणने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले होते. आता तो ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक सध्या तुफान गाजत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा