‘नाटक’ प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक व्यक्ती नाटकासाठी वेडी आहे. आणि मराठीमध्ये अतिशय उत्तम असे नाटक तयार होतात आणि त्या उत्तम नाटकांना साथ मिळते ती सर्वोत्तम कलाकारांची. नाटकं पाहणे हा तर अनेकांचं जणू छंदच असतो. आज मराठीमध्ये अनेक नाटकं घवघवीत यशस्वी होत असून, त्यांचे एकामागोमाग एक असे असंख्य प्रयोग होताना दिसत आहे. मात्र आपण आजपर्यंत कलाकारांच्या नाट्यगृहांबाबतच्या असंख्य तक्रारी ऐकल्या असतील. कलाकारांना त्यांच्या अप्रयोगास्तही राज्यात, देशात परदेशात फिरावे लागते. मात्र काही ठिकाणी त्यांना अनेक गरजेच्या सोयी देखील नीट उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे आजपर्यंत अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या तक्रारींना जगासमोर मांडले.
सध्या संपूर्ण महराष्ट्रात उन्हाचा तडाखा मोठा वाढला आहे. त्यामुळे अनेकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच नाटक अभिनेता असलेल्या वैभव मांगलेने देखील त्याचा त्याच्या नाट्यप्रयोगादरम्यान झालेल्या गैर सोयीची आणि त्यामुळे उन्हाच्या त्रासाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
वैभवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले. पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हालाही त्रास होतच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाही. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. या सगळ्यावर काय बोलावं?”
सध्या वैभव मांगले ‘संज्या-छाया’ या नाटकामध्ये भूमिका साकारताना दिसत आहे. वैभव यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्यांना त्यांच्या शहरातील विविध नाट्यगृह देखील सुचवली आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव
केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमध्ये देखील ‘या’ मराठी कलाकारांनी पाडलीये छाप