Saturday, June 29, 2024

नाट्यगृहातील अव्यवस्थेमुळे ‘हा’ दिग्गज अभिनेता भडकला, प्रेक्षकांची माफी मागत घेतला मोठा निर्णय

मागील काही काळापासून नाट्यगृहाची अव्यवस्था यावर नेहमीच अनेक नाट्य कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून, मुलाखतींच्या माध्यमातून आदी अनेकविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसतच असतात. मात्र काही दिवसांपूर्वीच अभिनेता वैभव मंगलेने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्याने राज्यातील काही नाट्यगृहांमधील अव्यवस्थेवर भाष्य केले होते. त्यानंतर पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक कलाकारांनी वैभवला पाठिंबा दिला तर सामान्य लोकांनी देखील त्यांना साथ दिली आहे. अशातच आता प्रतिभावान अभिनेता अशी ओळख असलेल्या भरत जाधवने देखील नाट्यगृहांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही त्याने तर एक मोठा निर्णयच घेतला असून, तो त्याने थेट प्रेक्षकांना सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

नुकताच भरत जाधवच्या ‘तू तू मी मी’ या नाटकाचा प्रयोग रत्नागिरीमध्ये संपन्न झाला. या प्रयोगादरम्यान भरतला एक मोठा आणि धक्कादायक अनुभव आला. यानंतर त्याने एक निर्णय घेतला आहे. भरतच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाट्यगृहात AC आणि साउंड सिस्टीम सतत बंद पडत होती. त्यामुळे प्रयोगात सतत अडथळा निर्माण होत होता. याच कारणामुळे भरत जाधव नाराज झाला आहे. त्याने म्हटले, “नाट्यगृहात AC नसल्याने काय होते हे आमच्या भूमिकेतून पाहा. एसी नसताना बंदिस्त नाट्यगृहात कशी अवस्था होते, हे कलाकाराच्या नजरेतून देखील पाहायला हवं. प्रचंड प्रकाशात काम करताना उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होते. प्रेक्षकांना तर उकाड्यासोबतच डासांचा त्रासही होतोय. तरीही तुम्ही सर्व एवढे शांत कसे राहू शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला.” आता तो रत्नागिरीत पुन्हा शो करणार नसल्याचे त्याने जाहीर केले आणि प्रेक्षकांची हात जोडून माफी देखील मागितली. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून भरत जाधव त्याच्या कुटुंबीयांबरोबर कोल्हापूरला स्थायिक झाले आहेत. अनेक गोष्टींचा विचार करून भरतने आता कोल्हापूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

हे देखील वाचा