Thursday, April 17, 2025
Home मराठी अरे बापरे! मराठीमधील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने ठोकला सोशल मीडियाला रामराम? ‘शेवटची पोस्ट’ केली शेअर

अरे बापरे! मराठीमधील ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने ठोकला सोशल मीडियाला रामराम? ‘शेवटची पोस्ट’ केली शेअर

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय, प्रतिभावान आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून प्रिया बाबतची ओळख आहे. प्रियाने मराठीमध्ये मालिका, चित्रपट नाटकांमध्ये तर काम केले आहेतच. सोबतच तिने हिंदीमध्ये देखील तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियाला तिच्या उत्तम अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. तिने तिच्या अभिनयाने आणि प्रतिभेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान तयार केले आहे. तिची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे.

प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून, ती सतत तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध पोस्ट शेअर करत असते. तिच्या पोस्ट देखील चांगल्याच व्हायरल होतात. मात्र नुकतीच तिची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून, यामुळे प्रिया देखील गाजत आहे. प्रियाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यात तिने शेवटचा फोटो असे लिहिले आहे त्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रियाने तिचा सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘शेवटची पोस्ट. नक्की.’ आता तिचे हे कॅप्शन वाचू सर्वांनाच प्रश्न पडला आहे की प्रिया आता इंस्टाग्रामला रामराम ठोकते की काय? त्यामुळेच तिची ही पोस्ट पाहून तिचे चाहते आता तिला असे काहीही न करण्यासाठी विनंती करताना दिसत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत तिला खूप प्रश्न विचारले आहेत. ‘का शेवटची पोस्ट?’ असा प्रश्न त्यांनी प्रियाला विचारला आहे. तर एकाने ‘नाही, अजून एक पोस्ट करा प्लीज’, अशी विनंती तिला केली आहे. ‘शेवटची पोस्ट म्हणल्यावर इन्स्टाग्रामचं काय होईल?’ असा प्रश्नही एका चाहत्याने तिला विचारला आहे.

मात्र प्रियाने शेवटची पोस्ट हे कॅप्शन इंस्टाग्रामसाठी नाही तर तिच्या फोटोंसाठी टाकलेले आहे. कारण प्रियाने तिच्या एकाच आऊटफिटवरचे अनेक फोटो पोस्ट केल्यामुळे तिने ‘हा फोटो शेवटचा, पक्कं’ असे लिहिले आहे. प्रियाने असे कॅप्शन टाकल्यानंतरही नेटकाऱ्यानी तिला “आमचे तुझ्यावर प्रेम आहे, तू कितीही फोटो टाकले नाही आम्हाला त्रास होणार नाही.” असे लिहिले, आहे.

दरम्यान प्रियाने ‘काकस्पर्श’, ‘वजनदार’, आम्ही दोघी’, ‘टाइम प्लिज’, ‘टाइमपास २’ अशा अनेक चित्रपटात तर ‘सीटी ऑफ ड्रीम्स’ , ‘…आणि काय हवं’ अशा सीरिजमध्येही काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जाहिरातींमधून अभिनय काराकिर्दीची केली सुरुवात; आज आहेत बाॅलिवूडचे प्रसिद्ध स्टार्स, एकदा पाहाच यादी

रवी किशन यांच्या सिनेसृष्टीतील अंमली पदार्थांवरील ‘त्या’ वक्तव्यावरून जया बच्चन यांनी त्यांना सुनावले होते खडेबोल

हे देखील वाचा