Tuesday, July 9, 2024

“तुम्ही कुठेच सुसंस्कृत दिसत नाहीत” मराठी अभिनेत्रीला ट्रोल केल्यानंतर तिने दिले सडेतोड उत्तर म्हणाली, ‘सुसंस्कृतपणा…’

कलाकारांना ट्रोल करणे ही बाब काय आता नवीन राहिलेली नाही. हिंदी, मराठी कोणताही कलाकार असला कितीही चांगला दिसत असला, वागत असला तरी तो ट्रोल होतोच. समाजात चांगले लोकं असतात तशी वाईट लोकं देखील असतात. तसेच आहे सोशल मीडियावर अनेक कौतुक करणारे सापडतील, मात्र त्यात निंदा करणारे देखील असतील. कलाकार लहान असो, मोठा असो, टीव्हीचा असो किंवा चित्रपट, नाटकातील कलाकार ट्रोल होतोच. मात्र या कलाकारांना ट्रोलिंग हाताळता येणे खूपच महत्वाचे आहे. कारण कधी कधी याचा स्वतःवर नकारात्मक परिणाम देखील दिसू शकतो. त्यामुळे कलाकार देखील ट्रोल झाल्यानंतर अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसतात. असेच काहीसे झाले आहे, मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या स्नेहलता वसईकरच्या बाबतीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rutu kamble (@rutukamble_.official)

स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून ‘सोयराबाई’ ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या स्नेहलताला ओळखत नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. प्रभावी अभिनयाने तिने तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्नेहलता तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. ती अनेकदा विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात राहते. सध्या ती डॉ. अमोल कोल्हे यांच्या तुफान गाजत असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यात स्नेहलता महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेच्या वेशभूषेतील एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला. यात ती तिच्या भूमिकेसाठी तयार होत आहे. त्यानंतर तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

स्नेहलताच्या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले, “महाराणीचा पेहराव केल्यामुळे कोणी सुसंस्कृत होत नसतं. त्यासाठी महाराणी असावं लागतं. तुमच्या इतर चित्रफिती बघितल्या आहेत, त्यात तुम्ही कुठेच सुसंस्कृत दिसत नाहीत.” ही कमेंट वाचून स्नेहलताने कमेंट करणाऱ्याला सडेतोड त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे. तिने कमेंटमध्ये लिहिले, “माझ्यासाठी सुसंस्कृतपणा विचारांमधून आणि वर्तनातून व्यक्त होतो. तरीही तुम्ही कपड्यावरून जज करू शकता. माझी काहीच हरकत नाही (मी हे असले विचार दुर्लक्षितच करते). विचार मांडण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य इथे प्रत्येकालाच आहे.”

स्नेहलताची ही कमेंट वाचून अनेक नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा देत ती योग्य बोलली असे म्हटले आहे. दरम्यान ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याला आणि स्नेहलताच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन

हे देखील वाचा