Sunday, March 16, 2025
Home मराठी अरे वा! अश्विनी महांगडे पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक सिनेमात, ‘या’ महान स्त्रीची साकारणार भूमिका

अरे वा! अश्विनी महांगडे पुन्हा एकदा दिसणार ऐतिहासिक सिनेमात, ‘या’ महान स्त्रीची साकारणार भूमिका

सध्या मराठी मनोरंजनविश्वात ऐतिहासिक सिनेमांची मोठी चलती आहे. अनेक ऐतिहासिक सिनेमे आतापर्यंत प्रदर्शित झाले, तर काही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशातच आता पुन्हा अजून एका नवीन ऐतिहासिक सिनेमाची नुकतीच घोषणा कऱण्यात आली आहे. या सिनेमात आपल्या प्रतिभावान आणि जिवंत अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे दिसणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून राणूअक्का ही भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली आणि वाहवाही मिळवणारी अश्विनी उत्तम अभिनेत्री आहे, यात शंकाच नाही.

मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर अश्विनी आता पहिल्यांदाच चित्रपटात मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. लवकरच अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा तयार होत आहे, यात ती मुख्य भूमिका साकारणार आहे. खुद्द अश्विनीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

अश्विनीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “इंदूर संस्थानचे संस्थापक, वीर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करते. आज अतिशय आनंदाची बातमी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. खूप मोठी जबाबदारी, मनावर दडपण आणि तितकाच आनंद होत आहे, कारण माझी प्रमुख भूमिका असलेला “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या चित्रपटाची आज घोषणा झाली. रसिक मायबाप प्रेक्षकहो याही चित्रपटावर आपण प्रेम करावे… तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.”

या पसोटसोबत तिने सिनेमाचे पहिले पोस्टर देखील शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अश्विनी अहिल्याबाई होळकर यांच्या रूपात दिसत आहे. मात्र सिनेमाबद्दल अधिकची कोणतीही माहिती अजून देण्यात आलेली नाही. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे आणि तिच्या या भूमिकेचे कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अश्विनी नुकतीच ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकली होती, सध्या अश्विनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा