Monday, April 15, 2024

दुःखद! दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील ‘या’ दिग्गज अभिनेत्याला मातृशोक

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते ममुटी याना मातृशोक झाला आहे. त्यांनी आई फातिमा इस्माईल यांचे दुःखद निधन झाले. त्या वयामुळे होणाऱ्या काही आजारांनी ग्रस्त होत्या. आजारपणामुळे त्यांना कोची येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र यादरम्यानच त्यांचे निधन झाले.

फातिमा यांच्यावर २१ एप्रिल रोजी संध्याकाळी चेम्ब जुमा मस्जिद कब्रिस्तान येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ममुटी यांच्या आई त्यांच्या सर्वात जवळच्या मैत्रीण होत्या. त्यांची आई गेल्यानंतर ते सर्वात दुखी आहे. ते पहिल्यापासूनच आईच्या सर्वात जवळ होते.

ममुटी यांनी एकदा त्यांच्या आईबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की जे चित्रपटामध्ये त्यांच्या भूमिकेला काही झाले तर ते त्यांच्या आईला सहन व्हायचे नाही. जर ते एखाद्या सिनेमात काम करत आहे, आणि त्यात त्यांच्या भूमिकेला मारतात, अपघात होतो आदी वाईट काही दाखवले तर ते पाहून त्यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू यायचे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये हे देखील सांगितले होते की, त्यांच्या आईला जर कधी विचारले की ममुटी यांचा आवडता सिनेमा कोणता? तर त्यांनी कधी उत्तर दिले नाही. त्या सरळ हात वर करून सांगायच्या मला माहित नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘माझा संघर्ष घरात प्रसिद्ध चेहरे असल्यामुळे…’ ‘या’ अभिनेत्रीने सांगितले तिच्या कठीण काळाबद्दल

प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ पोस्टवरून नेटकऱ्यांनी उडवली तिची खिल्ली विचारले, “हा कोणता खेळ आहे”

हे देखील वाचा