नुकतीच भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केळीची बातमी लोकं पचवत असताना आता अजून एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उडिया अभिनेत्री आणि गायिका असणारी रुचिस्मिता गुरू तिच्या नातेवाइकांच्या घरी मृतावस्थेत आढळली आहे.
रुचिस्मिता गुरु ही बलांगीर शहरातील तलपालीपाड़ाची मूळ रहिवाशी होती, ती सुडापाडा येथे तिच्या मामाच्या घरी होती. रुचिस्मिता गुरु ने अनेक म्युझिक अल्बम्समध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच ती गायनाच्या क्षेत्रात देखील सक्रिय होती. रुचिस्मिता गुरु ने अनेक स्टेज केले होते. या शोमध्ये ती तिचा दमदार परफॉर्मन्स देत फॅन्सला अक्षरशः वेड लावायची. तिच्या निधनामुळे उडिया इंडस्ट्रीमधून अनेकांनी शोक व्यक्त करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान रुचिस्मिता २६ मार्च २०२३ रविवार रोजी तिच्या रूममध्ये पंख्याला टांगलेल्या अवस्थेत दिसली. बलांगीर पोलिसांना याची माहिती मिताचा ते लगेच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तिची बॉडी पोस्टमोर्टमसाठी भीमा भोई मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय येथे पाठवली. यावेळी तिच्या आईने सांगितले की, त्यांचे रुचिस्मितासोबत आलू पराठा बनवण्यावरून भांडण झाले होते.
रचिस्मिताच्या आईने सांगितलेल्या माहितीनुसार ‘मी तिला रात्री आठच्या दरम्यान आलू पराठा बनवण्यास सांगितले, मात्र तिने ती १० वाजता बनवेल असे सांगितले. यावरूनच आमच्यात भांडण झाले.” सांगितले जात आहे की, याआधी देखील अनेक वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान सध्या पोलीस मृत्यूचे कारण शोधत असून, तिच्या पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पहिली जात आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?










