Sunday, July 26, 2026
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध गायक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध गायक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, पोस्ट शेअर करत दिली माहिती

आपल्या सुरेल आवाजाने लोकांचे मने जिंकणारा गायक म्हणजे पापोन. त्याने अतिशय सुपरहिट आणि प्रसिद्ध गाणी गायली असून, तो सतत लोकांचा आवडता गायक म्हणून चर्चेत असतो. मात्र आता त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. पापोनला मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पापोनने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती सर्वांना दिली आहे.

पापोनने त्याचा हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर करत त्याच्या फॅन्सला तो ऍडमिट असल्याचे सांगितले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही अशा छोट्या छोट्या लढाया एकट्यानेच लढतो. मला अशा सर्व गोष्टी सोशल मीडियावर दाखवायला आवडत नाही. मात्र काल रात्री जे घडले ते जरा वेगळे होते. मी रुग्णालयात होतो आणि माझ्या 13 वर्षांच्या मुलाने संपूर्ण रात्र माझ्यासोबत थांबण्याचे ठरवले. हा माझ्यासाठी खूपच भावनिक क्षण होता. हेच मला माझ्या शुभचिंतक आणि मित्रांसोबत शेअर करायचे. मी देखील माझ्या आई-वडिलांसाठी अशा गोष्टी केल्याचे मला आठवते. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. मला आता बरे वाटत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Papon (@paponmusic)

मात्र या पोस्टमध्ये त्याने कुठेही तो का ऍडमिट झाला, आणि त्यावर नक्की कशासाठी उपचार चालू हे सांगितले नाही. मात्र त्याच्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच अनेक सेलिब्रिटींनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान पापोन हा अतिशय लोकप्रिय गायक असून, त्याने बर्फी, सुल्तान, हमारी अधुरी कहानी, दम लगा के हइशा, बजरंगी भाईजान आणि करीब करीब सिंगल यासारख्या निवडक चित्रपटांसाठी त्याने गाणे गायली. पापोनचा स्वतःचा बँड आहे, तो एकमेव गायक आहे जो कोक स्टुडिओच्या तीनही सीझनचा भाग होता. रोडोर सिथि या आसामी चित्रपटातही त्याने काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

मैत्रिणीच्या बर्थडेला गेली अन् तिच्या भावाला पाहून अमृताचीच विकेट पडली! जाणून घ्या तिची लव्ह स्टोरी आणि पतीबद्दल

झोपेतून उठला आणि थेट उर्मिलाच्या प्रेमातच पडला, वाचा उर्मिला आणि आदिनाथ यांची भन्नाट प्रेमकहाणी

हे देखील वाचा