Thursday, September 28, 2023

संगीतसृष्टीवर शोककळा: संगीतजगतातील ‘या’ प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायकाचे दुःखद निधन

ओन्जबी इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक सुरिंदर शिंदा यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. लुधियानाच्या डीएमसीएच हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मागील काही दिवसांपासून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होते. त्यांची प्रकृती तशी गंभीर होतीच. अखेरीस आज २६ जुलैला त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पंजाबी इंडस्ट्रीसोबतच सर्वच संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून, सोशल मीडियावर आता त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

एका माहितीनुसार शिंदा यांना रेसपिरेटरी इंफेक्शन झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ होऊनही त्यांच्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नव्हती. अखेर अवयवांच्या निकामी होण्यामुळे २६ जुलै २०२३ रोजी त्यांचे निधन झाले आहे.

शिंदा हे पंजाबी इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक होते. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक हिट गाणी दिली. यात ‘पुत्त जट्टां दे’, ‘जट्टा जियोना मोर’, ‘काहर सिंह दी माउट’ आदी गाण्यांचा समावेश आहे. सोबतच त्यांनी ‘ऊंचा दर बेब नानक दा’ आणि ‘पुत्त जट्टां दे’ या चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता. सुरिंदर शिंदा हे प्रसिद्ध पंजाबी गायक कुलदीप मानक यांचे कलीग होते आणि त्यांनी दिवंगत अमर सिंग चमकीला यांना संगीत क्षेत्रात स्थावर होण्यासाठी मदत केली होती.

शिंदा यांचे खरे नाव सुरिंदर पाल धम्मी असे होते. सुरिंदर यांचा जन्म २० मे १९५४ साली पंजाबच्या जलनधारमध्ये झाला होता. त्यांनी त्यांच्या भावपूर्ण आणि दमदार आवाजाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचे झाले तर त्यांना मनिंदर शिंदा नावाचा एक मुलगा आहे. त्यांच्या निधनामुळे पंजाबी सिनेक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

हे देखील वाचा