Thursday, July 31, 2025
Home साऊथ सिनेमा ये बाबो इतकी फी! ‘या’ सुपरस्टारने तर फी घेण्याच्या बाबतीत सलमान, शाहरुखला देखील दिली मात

ये बाबो इतकी फी! ‘या’ सुपरस्टारने तर फी घेण्याच्या बाबतीत सलमान, शाहरुखला देखील दिली मात

दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेता थलापति विजय याला अमाप फॅन फॉलवोइंग आहे. साऊथमध्ये काम करून देखील त्याची पॅन इंडिया फॅन फॉलोविंग आहे. तामिळ इंडस्ट्रीमधील ‘A’ लिस्टेड अभिनेता म्हून त्याची ओळख आहे. एका रिपोर्टनुसार विजय त्याच्या एका सिनेमासाठी तब्बल १०० कोटी फी घेत असल्याची माहिती आहे. मात्र त्याच्या सिनेमाची कमाई देखील तुफान होत असते. मध्ये बातमी आली होती की, विजय आता त्याच्या एका सिनेमासाठी तब्बल २०० कोटी घेत आहे. आता या मागील सत्य समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी कोणीतरी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यात विजय एका सिनेमासाठी २०० कोटी फी घेत असल्याचे सांगितले होते. आता यामागील सत्य समोर आले असून, विजय संपूर्ण देशातील एक असा अभिनेता आहे जो सर्वात जास्त फी घेत आहे. तो २०० नाही तर १२५ कोटी फी एका सिनेमासाठी घेतो. त्याचा वारिसु सिनेमाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर त्याने त्याची फी वाढवली आहे. मिळणाऱ्या माहितीनुसार “त्याच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि डिजिटल राइट्स यांना पाहून निर्माते विजयला त्याच्या सिनेमात घेण्यासाठी जास्त फी देण्यासही तयार आहेत. चित्रपटाची कहाणी जी पण असेल, तो यशाची ग्यारंटी देऊ शकतो. यासाठी निर्माते देखील रिस्क घ्यायला तयार आहेत.”

थलापति विजयच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो ‘वारिसु’ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा तामिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. आता थलापति विजय लवकरच लोकेश कनगराज यांच्या ‘लिओ’ सिनेमात दिसणार असून, यात संजय दत्त देखील असणार आहे. हा सिनेमा १९ ऑक्टॉबरला प्रदर्शित होईल.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

काय सांगता! लग्नाच्या आधी ज्युनियर एनटीआर ‘या’ कारणामुळे अडकला होता कायद्याच्या कचाट्यात
नवाजुद्दीन सिद्दीकीचे ‘ते’ सदाबहार डायलॉग, ज्यावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

हे देखील वाचा