Wednesday, July 3, 2024

कौतुकास्पद! मनोरंजनविश्वात राहूनही ‘हा’ सुपरस्टार मोबाइल आणि सोशल मीडियापासून आहे कोसो लांब

आजच्या काळात मोबाईल ही वस्तू नाही तर गरज झाली आहे. मोबाइलशिवाय आणि सोशल मीडियाशिवाय आयुष्याची आजच्या काळात कोणी कल्पना देखील करू शकणार नाही. हजारात एखादा असेल जो मोबाईल वापरत नसेल. त्यातही असे अनेक लोकं सापडतील जे सोशल मीडियावर नसतील मात्र त्यांच्याकडे फोन असेल. मनोरंजनविश्वात तर प्रत्येक कलाकार त्यांचा फोन सतत सोबत ठेऊनच फिरतात. अगदी सेकंडभर देखील त्याला नजरेआड होऊ देत नाही. अशाच इंडस्ट्रीमध्ये राहून जर आम्ही तुम्हाला सांगितले की, एक असा कलाकार आहे, जो सोशल मीडियावर तर नाहीच आहे पण तो फोन देखील वापरत नाही. तर तुमचा विश्वास बसेल? नाही ना पण असा एक अभिनेता आहे को या दोन्ही गोष्टींपासून खूप लांब आहे आणि तरीही त्याचे आयुष्य सुरळीत चालू आहे.

आम्ही बोलत आहोत दाक्षिणात्य अभिनेता अजित कुमारबद्दल. हो साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार असलेला अजित ना मोबाईल वापरत नाही तो सोशल मीडियावर आहे. तरीही त्याचे जीवन कोणत्याही अडचणीशिवाय अगदी सामान्यपणे सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल, मोबाईल नाही तर तो सर्व कसे मॅनेज करतो? अजित जरी मोबाईल वापरत नसला तरी त्याचा मॅनेजर सतत त्याच्यासोबत असतो आणि त्याचा मॅनेजर सर्व अजितची फोन संबंधित कामं पाहतो. कोणाला अजित कुमारशी संपर्क करायचा असल्यास त्याच्या मॅनेजरकडे फोन करावा लागतो.

सोशल मीडियाच्या बाबतीतही तसेच आहे. अजित जरी सोशल मीडियावर नसला तरी त्याचा मॅनेजर सोशल मीडियावर आहे. तोच अजितशी संबंधित सर्व माहिती, घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे कामं करतो. अजून एक खास बाब म्हणजे शुटिंगवेळी अजित जो फोन वापरतो, त्या फोनमधले सिम तो शूटिंग झाली की फेकून देतो आणि पुढच्या शूटिंगसाठी नवीन सिम घेतो. जेणेकरून त्याला त्या नंबरवर अनावश्यक लोकांनी फोन करून त्रास देऊ नये. आजच्या काळात असा व्यक्ती असणे म्हणजे खूपच विशेष आणि लक्षवेधी बाब आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

विकिपीडिया मावशींची ‘ही’ चूक ठरली जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांच्यासाठी डोकेदुखी

“सलमानसाठी सर्वात सुरक्षित जागा…” सलमान खानच्या सुरक्षेवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा