Tuesday, July 9, 2024

क्या बात है! अखेर ‘या’ सुपरस्टारचे सोशल मीडियावर धमाकेदार पदार्पण, पहिली पोस्ट शेअर करत लिहिले…

सोशल मीडियाने मधल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर त्यांची पकड लोंकांवर मजबूत केली आहे. सामान्य लोकांपासून सेलिब्रिटीज पर्यंत सर्वच लोकं सोशल मीडियावर सक्रिय आहेत. एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याचा काही अंशी अधिकार या सोशल मीडियाने सर्वांनाच मिळवून दिला आहे. कलाकार आणि फॅन्ससाठी तर हे माध्यम म्हणजे संपर्काचे एक उत्तम साधन झाले आहे. मात्र या प्लॅटफॉर्मवर सर्वच कलाकार असतात असे नाही. काहींनी सुरुवातीपासूनच या सोशल मीडियाचा वापर सुरु केला तर काही हळूहळू या प्लॅटफॉर्मकडे येत आहेत.

अशातच आता साऊथचा सुपरस्टार असलेल्या विजय थलापतिने देखील या इंस्टाग्रामवर जोरदार एन्ट्री मारली आहे. विजयला फक्त साऊथच नाही तर संपूर्ण जगभरात कोट्यवधींची फॅन फॉलोविंग आहे. त्याच्याबद्दल नेहमीच त्याच्या फॅन्सला जाणून घ्यायचे असते. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवायचे असते. मात्र तो सोशल मीडियावर नसल्याने फॅन्सकडे कोणताच पर्याय नव्हता. मात्र आता विजय इंस्टाग्रामवर आल्याने त्याचे फॅन्स चांगलेच खुश झाले आहेत. विजयने या एन्ट्रीसोबतच एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay (@actorvijay)

विजय थलापतिने इंस्टाग्रामवर एन्ट्री केल्या केल्या त्याला लाखो फॅन्सने फॉलो केले असून, अजूनही ही यादी वाढतच आहे. विजयने यावेळी त्याचा एक ब्लॅक अँड व्हाईट लूकमधला फोटो शेअर केला असून, ‘हॅल्लो मित्रांनो’ असे कॅप्शन त्याला दिले आहे. त्याचा हा सॉल्ट अँड पेपर लूक कमालीचा व्हायरल होत असून, त्याचा फोटो देखील व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर आल्यानंतर केवळ २० मिनिटात त्याचे १२० हजार पेक्षा अधिक फॉलोवर्स झाले होते. आता तर हे वाढून २.६ मिलियन झाले आहेत.

दरम्यान विजय थलापतिच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, तो ‘वरिसु’ या सिनेमात दिसला होता. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली होती. लवकरच तो ‘लिओ’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत संजय दत्त देखील असेल. हा सिनेमात ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच विजय शाहरुख खानसोबत ‘जवान’ सिनेमात देखील दिसणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
HAPPY BIRTHDAY: विक्रांत मैसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्ही शोमध्ये निभावल्या आहेत मनोरंजक भूमिका
‘नाटू- नाटू’ गाण्यावर बाॅलिवूसह टाॅलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लावले ठूमके, तर पठाणने दिली आयकॉनिक पोज

हे देखील वाचा