Sunday, March 16, 2025
Home अन्य Thomas Cup 2022 | भारताच्या ऐतिहासिक विजयावर सेलेब्सने केले बॅडमिंटन संघाचे कौतुक, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

Thomas Cup 2022 | भारताच्या ऐतिहासिक विजयावर सेलेब्सने केले बॅडमिंटन संघाचे कौतुक, जाणून घ्या कोण काय म्हणाले?

आज भारतीय बॅडमिंटन संघाने ऐतिहासिक विजय नोंदवून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. ७३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघाने थॉमस कप विजेतेपद पटकावले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारताने १४ वेळा चॅम्पियन ठरणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करून विजय मिळवला आहे. यामुळे देशभरातील लोक खूप आनंदी असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय बॅडमिंटन संघाचे या विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. या ऐतिहासिक विजयाने सिनेजगतातही आनंदाची लाट उसळली असून, तापसी पन्नूपासून अनिल कपूर आणि रितेश देशमुखपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी भारतीय संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण काय म्हणाले… (thomas cup 2022 celebriti’s applaud indias historic win)

तापसी पन्नू (Taapsee Pannu)
अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या ट्विटरवर भारतीय संघाच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि ऐतिहासिक क्षणाची एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ही क्लिप शेअर करत तिने लिहिले की, “इतिहास!!! भारताने पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचत थॉमस कप जिंकला !!!”

अनिल कपूर (Anil Kapoor)
अभिनेता अनिल कपूरनेही आपल्या ट्विटर हँडलवर भारतीय संघाने थॉमस कप जिंकल्याचा आनंद साजरा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी टीमचे कौतुक करत लिहिले, “हे अविश्वसनीय आहे!! भारतीय संघाचे अभिनंदन!! ऐतिहासिक क्षण!!”

आर माधवन (R Madhavan)
रॉकेट्री स्टार अभिनेता आर माधवनने टीम इंडियाच्या विजयावर पोस्ट शेअर करत लिहिले, “ऐतिहासिक विजेतेपद, थॉमस कपमध्ये भारताने इंडोनेशियाला ३-० ने हरवले.” यासह त्याने काही शब्दांत आपला आनंद व्यक्त केला.

राहुल बोस (Rahul Bose)
अभिनेता राहुल बोसनेही त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आणि लिहिले, “भारतीय खेळासाठी संस्मरणीय दिवस. संघ आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन”. यासोबत त्याने थॉमस कपचा हॅशटॅग पोस्ट केला.

रितेश देशमुख (Riteish Deshmukh)
अभिनेता रितेश देशमुखनेही ट्वीट करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “थॉमस कप २०२२ टीम इंडियासाठी किती विलक्षण कामगिरी आहे… फायनलमध्ये १४ वेळा चॅम्पियन इंडोनेशियाचा ३-० ने पराभव केला. संपूर्ण संघ, प्रार्थना, प्रशिक्षक सपोर्ट स्टाफ आणि संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन.”

जयराम सुब्रमण्यम (Jayram Subramanyam)
टीम इंडियाला शुभेच्छा देताना साऊथ अभिनेता जयराम सुब्रमण्यमने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर लिहिले, “आमचे कुटुंब देखील या ऐतिहासिक कार्यक्रमाचा एक भाग असल्याने, हे खूप उत्साही आहे… संघाचे प्रशिक्षक म्हणून विमल जीचे अभिनंदन, जय हिंद.”

राणा डग्गुबती (Rana Daggubati)
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राणा डग्गुबतीनेही आपल्या ट्विटर हँडलवर टीम इंडियाच्या विजयाबाबत़ लिहिले, “हे आश्चर्यकारक आहे!! भारतीय बॅडमिंटन संघाचे अभिनंदन.”

एसएस राजामौली (SS Rajamouli)
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही ट्विटरच्या माध्यमातून भारताला थॉमस कप जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केले की, “भारतीय बॅडमिंटन संघाची अतुलनीय कामगिरी, प्रतिष्ठित थॉमस कप घरी आणल्याबद्दल अभिनंदन.”

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
महानायक अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर थॉमस कपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचा एक फोटो शेअर करत त्यांनी त्यांना चिअर करण्याच्या शैलीत लिहिले, “भारत! भारत!! भारत!!!”

देशभरातून या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे आणि सर्वजण भारतीय बॅडमिंटन संघाचे भरभरून कौतुक करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा