हॉलिवूडचा बहुचर्चित थॉर सिरीजचा नवीन भाग ‘थॉर: लव अँड थंडर’ भारतात ७ जुलैला, तर जगभरात ८ जुलैला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली. मात्र, भारतात पहिल्या दिवसाएवढा प्रतिसाद दुसऱ्या दिवशी मिळाला नाही. पहिल्या दिवसापेक्षा जवळपास ३० टक्क्यांनी कमी कमाई या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केली. तरी भारतात दोन दिवसात जवळपास ३० कोटींची कमाई या चित्रपटाची राहिली.
पण, जगभरात पहिल्याच दिवशी ३६५ कोटींहून अधिक रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. अमेरिकेतूनच २३० कोटींची कमाई झाली, तर अन्य देशांमधून १२४ कोटी चित्रपटाने कमावले. रिपोर्ट्सनुसार १९८३ कोटींचे या चित्रपटाचे बजेट आहे.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)