Saturday, June 29, 2024

धक्कादायक! मुकेश अंबानी, अमिताभ बच्चनसह धर्मेंद्र यांची घरे बॉम्बने उडवण्याची धमकी

महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला असून, चांगलीच खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना केलेल्या कॉलमध्ये देशातील अनेक नामांकित व्यक्तींच्या घरावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर स्पाेट करण्याचे सांगितले.

माध्यमातील वृत्तांनुसार, कॉलरने दावा केला आहे की, मुकेश अंबानी यांच्या घर अँटिलियामध्ये स्फोट होईल. फोनवर त्या व्यक्तीने अमिताभ आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध कालाकांराच्या घरात स्फोट हाेण्याबाबतही सांगितले. या फोन कॉलनंतर नागपूर पोलीस सतर्क झाले असून त्यांनी मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. सध्या मुंबई पोलीस कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

खरे तर, एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले. या फोन कॉलनंतर नागपूर पोलिसांनी तातडीने त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली, त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून शोध सुरू केला. या फोन कॉलवर त्या व्यक्तीने असाही दावा केला आहे की, दहशतवादी हल्ला करण्यासाठी 25 दहशतवादी दादरमध्ये पोहोचले आहेत. (threat call received by nagpur police control room to blow up mukesh ambani bollywood actor amitabh bachchan and actor dharmendra house)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! समंथा रुथ प्रभूचा शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री गंभीररित्या जखमी

राखी भडकली मुंबई पाेलिसांवर; म्हणाली, ‘सेलिब्रिटींना न्याय देऊ शकत नाही, सामान्य माणसाला…’

हे देखील वाचा