Tuesday, July 9, 2024

‘रमता जोगी’ गाण्यावर तीन मुलींनी केला डोळ्यांचं पारणं फेडणारा डान्स; पाहून तुमचेही थिरकतील पाय

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अनिल कपूरचा सन 1999 मध्ये ‘ताल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील ‘रमता जोगी’ हे गाणे खूप प्रसिद्ध झाले होते. या गाण्याची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. एवढंच नाही तर अनेक कलाकारांनी या गाण्यावर डान्स करून डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशातच या गाण्यावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तीन मुली मिळून या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

‘रमता जोगी’ या गाण्याचे संगीत एवढे सुंदर आहे की, जो कोणी हे गाणे ऐकले त्याचे पाय थिरकायला लागतात. ‘लाइव्ह टू डान्स विथ सोनाली’ नावाच्या एका यूट्यूब चॅनेलव्दारे हा व्हिडिओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तीन मुली सुंदर डान्स करताना दिसत आहेत. प्रेक्षक या व्हिडिओला खूप पसंती दर्शवत आहेत. त्यांच्या डान्समधील प्रत्येक स्टेप वेगळ्या पद्धतीने तयार केली आहे.

या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सगळेजण त्यांच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत. हा डान्स व्हिडिओ मागच्या महिन्यात यूट्यूबवर अपलोड केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक वेळा पाहिला गेला आहे.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा एक व्हिडिओ  व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अनिल कपूरने रमता जोगी या गाण्यावर डान्स केला होता. हा व्हिडिओ त्याची पत्नी सुनीता हिने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा