Monday, April 21, 2025
Home बॉलीवूड जेव्हा ‘ड्रीम गर्ल’ने धरम पाजींना वेतागून केला होता फोन; म्हणाल्या होत्या, ‘तुम्हाला माझ्याशी…’

जेव्हा ‘ड्रीम गर्ल’ने धरम पाजींना वेतागून केला होता फोन; म्हणाल्या होत्या, ‘तुम्हाला माझ्याशी…’

सिनेसृष्टीमध्ये कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. अशात काही दिग्गज कलाकार सध्या चित्रपटांमध्ये झळकत नसले, तरी त्याचे सहकलाकारांवर असलेले प्रेम अद्यापही कायम आहे. त्यामुळेच ते सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय ठरतात. अशात बॉलिवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमकहाणीची चर्चा तुम्ही ऐकलीच असेल. मात्र, तुम्ही आतापर्यंत न ऐकलेल्या त्यांच्या लग्नाविषयीचा एक किस्सा जाणून घेऊ.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचे. दोघांनाही लग्न करून एकत्र आयुष्य जगायचे होते. मात्र, या दोघांच्या प्रेमामध्ये धर्मेंद्र यांचे पहिले लग्न आणि त्यांची मुलं समस्या बनले होते. कारण, हेमा मालिनी यांच्या कुटुंबीयांना विवाहित पुरुषांशी आपल्या मुलीचे लग्न व्हावे हे कधीच मान्य नव्हते. मात्र, हेमा मालिनी फार जिद्दी होत्या.

त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “माझ्या कुटुंबीयांना आमचं नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी विरोध केला, पण मी देखील ठरवलं की, मी फक्त धर्मेंद्र यांच्याशीच लग्न करणार. इतर कोणत्याही व्यक्तीला मी जीवनसाथी म्हणून स्वीकारणार नाही. एक दिवस वैतागून मी धर्मेंद्र यांना फोन केला आणि त्यांना म्हणाले, तुम्हाला माझ्याशी लग्न करावेच लागेल.”

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र त्यावेळी नाकारू शकले नाहीत. कारण, ते देखील त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. त्यामुळे त्यांनी हेमा यांना होकार कळवला. त्यानंतर या दोघांनी साल १९८० मध्ये विवाह केला. दोघेही सध्या सुखी आयुष्य जगत आहेत. त्यांना दोन मुली आहेत. अहाना देओल आणि ईशा देओल अशी त्यांची नावे आहेत. अहाना ही एक डान्सर आहे, तर ईशा आई- वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकिर्दीत ‘शराफत’, ‘राजा जानी’, ‘प्रतिज्ञा’, ‘जुगनू’, ‘शोले’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र अभिनय केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आगामी ‘८३’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अभिनेता खूपच उत्सुक; म्हणाला, ‘…क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित करेल’

-बाबो, हिने तर समुद्रातच आग लावली की! दिशा पटानीचे पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमधील सिझलिंग फोटो

-‘आमच्या नात्यात संवाद असता तर…’ करणने शमितासोबत शेअर केले ब्रेकअपचे कारण

हे देखील वाचा