Monday, July 1, 2024

खाकीचा दणका!! कोरोना निर्बंधांचे उल्लंघन, अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीवर गुन्हा दाखल

संपूर्ण देशात कोविड 19 सारखा आजार पसरला आहे. यातच सरकारने लॉकडाऊन कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे काम नसताना घराबाहेर कोणी जाऊ शकत नाही. यातच काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तरीही नागरिक घराबाहेर जाण्यासाठी घाबरत आहेत. यातच बॉलिवूडमधील कलाकारही घराबाहेर पडताना दिसत आहेत. नुकतेच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे दोघे घराबाहेर फिरताना दिसले आहेत.

टायगर श्रॉफवर सार्वजनिक ठिकाणी काहीही कारण नसताना इकडे तिकडे फिरून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी केस दाखल झाली आहे. मुंबई पोलीसातील एक अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले होते की, दुपारी 2 नंतर कोणत्याही कारणा‌ शिवाय इकडे तिकडे फिरण्यास बंदी आहे. परंतु टायगर श्रॉफ हा संध्याकाळपर्यंत बांद्रा स्टेशनवर फिरताना दिसला आहे. त्याचावर कलम 188 लावून गुन्हा दाखल झाला आहे.

टायगर श्रॉफ सोबत त्याची गर्लफ्रेंड दिशा पटानी देखील त्याच्या सोबत होती. ते दोघेही रात्री उशिरा ड्राईव्हवर जाताना स्पॉट झाले आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दरम्यान पोलिसांनी त्यांना अडवले आणि चौकशी केली.

माध्यमातील वृत्तानुसार, दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ हे दोघे जिमनंतर ड्राईव्हला निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यावेळी दिशा पुढच्या शिटवर तर टायगर मागच्या शीटवर बसलेला होता. तेव्हा पोलिसांना त्यांना थांबवले. पोलिसांनी त्यांच्यकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या सगळ्याची चौकशी केली.

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे मागील काही दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत. परंतु त्यांनी अधिकृत रित्या अजूनही या गोष्टीचा खुलासा केला नाही. ते अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच दिशाचे टायगरच्या कुटुंबासोबत खूप चांगले संबंध आहेत.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, दिशा नुकतीच ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात दिसली होती. या सोबत ती लवकरच ‘केटिना’ आणि ‘विलेन 2’ मध्ये दिसणार आहे. टायगर श्रॉफ हा ‘हीरोपंती 2’, ‘गणपत’ आणि ‘बागी 4’ या चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा