Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड गुलाबी ओठांमुळे पहिल्या चित्रपटात ट्रोल झाला टायगर श्रॉफ, दुसऱ्या चित्रपटातील ऍक्शन पाहून सगळेच झाले हैराण

गुलाबी ओठांमुळे पहिल्या चित्रपटात ट्रोल झाला टायगर श्रॉफ, दुसऱ्या चित्रपटातील ऍक्शन पाहून सगळेच झाले हैराण

टायगर श्रॉफ हा बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी एक आहे. जो त्याच्या कामावर खूप लक्षकेंद्रित करत असतो. तो त्याचा संपूर्ण वेळ फिटनेस आणि स्पोर्ट्सला देतो. यामुळेच बॉलिवूडमधील तो सगळ्यांचा आवडता अभिनेता आहे. त्याचे वडील जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते असूनही टायगरने त्याच्या मेहनतीने या सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत. अशातच बुधवारी (२ मार्च रोजी तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया त्याचा करीअरमधील प्रवास.

टायगर श्रॉफचा (tiger shroff) जन्म २ मार्च १९९० मध्ये झाला. अनेकांना ही गोष्ट माहीत देखील नसेल की, टायगरचे खरे नाव हेमंत हे आहे. त्याला लहान असताना सगळेजण प्रेमाने टायगर म्हणायचे. त्याने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याने ठरवले की, तो त्याचे नाव हेमंत बदलून टायगर असे ठेवेल. आज सर्वत्र तो टायगर या नावानेच प्रसिद्ध आहे.

साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या ‘हिरोपंती’ या चित्रपटातून टायगरला लॉन्च केले. बॉलिवूडमध्ये त्याच्या करीअरची सुरुवात २०१४ साली झाली. त्याच्या अभिनयासोबतच त्याचा फिटनेस आणि डान्स सगळ्यांना खूप आवडला. परंतु पहिल्याच चित्रपटानंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आले. काहींनी त्याच्या गुलाबी ओठांची मजा उडवली, तर काहींना त्याला तो मुलीसारखा दिसतो असे म्हणून चिडविले. परंतु त्याच्या दुसऱ्या चित्रपटाने सगळ्याची बोलती बंद झाली.

त्याच्या दुसऱ्या ‘बागी’ या चित्रपटात त्याची ऍक्शन पाहून सगळेच हैराण झाले. तो सध्या सगळ्यात जबरदस्त ऍक्शन हिरो आहे. त्यानंतर त्याने ‘बागी २’, ‘स्टूडेंट ऑफ द इअर २’, ‘वार’, ‘बागी ३’ यांसारख्या चित्रपटात काम केले. ‘वार’ या चित्रपटात त्याने ऋतिक रोशनसोबत काम केले. त्याचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता.

टायगर श्रॉफ त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत असतो. त्याचे नाव मागील अनेक दिवसापासून अभिनेत्री दिशा पाटनीसोबत जोडले गेले आहे. परंतु त्यांनी आजपर्यंत कधीच त्यांचे नाते अधिकृत पणे सांगितले नाही. टायगर सध्या त्याचे आगामी चित्रपट ‘हिरोतंती २’, ‘गणपत’ आणि ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटात व्यस्त आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा